एशिया कप 2018 : क्रिकेट चाहत्यांना वेड लावणारी 'ती' पाकिस्तानी तरूणी नेमकी कोण ?
नव्या नरोरा photo Credits : Twitter

एशिया कप 2018 मध्ये सध्या सुपर फोरसाठी सामने सुरू आहेत. दुबईमध्ये रंगणार्‍या एशिया कपचे सामने दिवसेंदिवस चुरशीचे होत चालले आहेत. भारत - पाकिस्तान हे क्रिकेटच्या मैदानावरील पक्के वैरी जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उतरतात तेव्हा टशन अ‍टळ असतेच. परंतू यंदा एशिया कपमध्ये मैदानावरील सामन्यात जितकी उत्सुकता असते तितकीच उत्सुकता सध्या स्टेडियमधील एक मुलीबाबत आहे. भारत - पाक क्रिकेट सामन्यादरम्यान एका मुलीवर अनेक चाहते फिदा आहेत.

कोण आहे ही मुलगी ?

एशिया कपमध्ये चाहत्यांना एका पाकिस्तानी क्रिकेट चाहतीने वेड लावले आहे. या सुंदर मुलीला पाहण्यासाठी अनेक चाहते टीव्ही स्क्रिनसमोर बसलेले असतात. पाकिस्तानी मुलीच्या सौंदर्यावर अनेकजण भुलले आहेत. तिच्या अदांचा सोशल मीडीयात खास चाहतावर्ग आहे.

नेटकर्‍यांनी केलेल्या दाव्यानुसार या पाकिस्तानी फॅन मुलीचं नाव नव्या नरोरा आहे. दुबईतील भारत पाकसामन्यांदरम्यान नव्या हमखास स्टेडियममध्ये हजेरी लावते. पाकिस्तानच्या जर्सीमध्ये उपस्थित या तरूणीची झलक पाहण्यासाठी अनेक चाहते बैचेन असतात. या मुलीची झलक पाहिल्यानंतर अनेकांनी सोशलमीडियावर तिच्या सौंदर्यांचं कौतुक करणारे पोस्ट शेअर केले आहेत.

navya narora
नव्या नरोरा (phooto Credit :Instagram)

सोशल मीडियावर नव्या नरोरा या नावाने अनेक अकाऊंट्स सुरू आहेत. त्यामुळे नेमकं तिचं कोणतं असा प्रश्नही चहत्यांमध्ये पडला आहे.

एका चाहत्याने चक्क या तरूणीची झलक पहायला मिळावी म्हणून भारत पाक सामने वाढवण्याचीही मागणी केली आहे. एशिया कप 2018 : 'त्या' पाकिस्तानी फॅनला पाहून पुन्हा भारतीय क्रिकेट चाहते सुखावले