एशिया कप 2018 :  'त्या' पाकिस्तानी फॅनला पाहून पुन्हा भारतीय क्रिकेट चाहते सुखावले
नव्या नरोरा photo Credits : Twitter

एशिया कपमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर मात केली आहे. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाला भारताने 237 धावांवरच रोखले. त्यानंतर 238 धावांचा पाठलाग करताना शिखर धवन आणि रोहित शर्माने दमदार कामगिरी केली. एशिया कप 2018 : भारताविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर उडवण्यात आली पाकिस्तानची खिल्ली !

नव्या नरोरा नवं आकर्षण

भारत -पाकचं क्रिकेटच्या मैदानावरून युद्ध क्रिकेट चाहते जितक्या उत्साहाने एन्जॉय करतात तितकंच या सामान्याचं एक आकर्षण म्हणजे नव्या नरोरा. नव्या नरोरा ही पाकिस्तानच्या क्रिकेट संघाची चाहती आहे. पाकिस्तानच्या सामन्याला स्टेडिअममध्ये हजर राहून ती संघाला पाठींबा देते. नव्याच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. प्रामुख्याने भारतीय चाहते तिला पाहून खूपच खूष होतात. नव्याच्या सौंदर्याची तारीफ केल्याचे काही ट्विट्स सोशल मीडियात खूपच धूमाकुळ घालत आहेत.  एशिया कप 2018 : क्रिकेट चाहत्यांना वेड लावणारी 'ती' पाकिस्तानी तरूणी नेमकी कोण ?

पहिल्या भारत-पाक सामन्यापासूनच अनेकांची नजर नव्या नरोरावर खिळली होती. अनेकांनी तिला पाहता यावं म्हणून चक्क भारत- पाक सामने वाढवा अशी बीसीसीआयकडे मागणीही केली होती.