Mysterious Furry Snake (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगात अनेक प्रकारचे साप (Snake) आढळतात. यातील अनेक साप इतके दुर्मिळ आहेत की ते कधीच दिसत नाहीत. सध्या थायलंडच्या एका सापाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा साप इतका दुर्मिळ मानला जात आहे की, कदाचित तुम्हीदेखील असा साप याआधी कधी पाहिला नसेल. हा रहस्यमयी साप हिरव्या रंगाचा असून दिसायला खूप गोंडस दिसतो. पाहणाऱ्याला कदाचित वाटू शकेल की हा गवताचा पेंढा आहे, परंतु तो एक साप आहे. या सापाचा व्हिडिओ थायलंडमधील (Thailand) रहिवासी असलेल्या 49 वर्षीय ‘तू’ने (Tu) शूट केला आहे.

हा साप त्यांनी नक्की कुठे पाहिला हे माहीत नसले तरी आयुष्यात पहिल्यांदाच असा साप पाहिल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणतात, ‘माझ्या कुटुंबाला आणि मला वाटले की या सापाचा व्हिडिओ लोकांसोबत शेअर करावा जेणेकरून लोकांना या सापाबद्दल माहिती होईल आणि तो त्यांच्यासाठी संशोधनाचा विषय ठरेल. कदाचित साखोन नाखोन प्रांतातील त्यांच्या घराजवळील चिखलाच्या दलदलीत त्यांनी असा साप पाहिल्याचे ते म्हणतात.

द सायन्स टाईम्सच्या वृत्तानुसार, या सापाचे नाव Furry Snake आहे. असा साप मुख्यतः पाणचट भागात आढळतो. या सापाची कातडी गवतासारखी असल्याने ते सहजपणे त्यांची शिकार करतात. या सापांना पफ फेस्ड साप असेही म्हणतात. यातील बहुतेक साप फक्त आग्नेय आशियातच आढळतात, तसेच ते इतर सापांपेक्षा कमी विषारी असतात. (हेही वाचा: मंगळ ग्रहावर सापडला फूलासारखा दडग; शास्त्रज्ञही झाले हैराण; See Photos)

NSW सेंट्रल कोस्टवरील वाइल्डलाइफ एआरसीच्या तज्ज्ञांच्या मते, असा सापांवरील फर सारखा पदार्थ केराटिनपासून बनलेला असतो, जो त्वचेच्या वरचा थर असतो. याला पफ फेस वॉटर स्नेक किंवा मास्क्ड वॉटर स्नेक असेही म्हणतात, जे बहुतेक गरम ठिकाणी आढळतात. ते सामान्यतः उत्तर सुमात्रा ते सालंगा बेट, इंडोनेशिया आणि बोर्नियो येथे आढळतात. ते पाण्यात आणि खडकाळ जागी लपून त्यांची शिकार करतात.