Flower on Mars: मंगळ ग्रहावरून अनेक नव-नवीन फोटो येत असतात. जी कोणालाही आश्चर्यचकित करू शकतात. अनेक आकारांचे आणि रंगांचे दगड मिळाल्यानंतर आता या ग्रहावर असा दगड दिसला आहे, जो फुलासारखा दिसतो. त्याचे छायाचित्र नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने घेतले आहे. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटले की ते एक फूल आहे. परंतु, तपासात हा एक दगड असल्याचं आढळून आलं आहे. खनिजांच्या समावेशामुळे फुलासारखा दगड तयार झाला आहे. या दगडाचे फोटो पाहिल्यानंतर असं वाटतं की, फुलांच्या वेगवेगळ्या पाकळ्या वेगवेगळ्या दिशेने बाहेर पडत आहेत. अशा आकारांना डायजेनेटिक क्रिस्टल क्लस्टर म्हणतात. डायजेनेटिक म्हणजे त्रिमितीय आकार वेगवेगळ्या खनिजांच्या मिश्रणाने तयार होतो. या फुलामध्ये अनेक खनिजांचे मिश्रण असते.
क्युरिऑसिटी मिशनचे डेप्युटी प्रोजेक्ट सायंटिस्ट अबीगेल प्रेमन यांनी आपल्या ट्विटरवर लिहिले की, अशा आकृत्या क्षारांपासून बनवल्या जातात, ज्याला सल्फेट म्हणतात. मोठ्या दगडावर असलेल्या खनिजांच्या विविध कणांच्या मिश्रणाने ते तयार होतात. वाऱ्याची दिशा आणि गती बदलत राहिल्याने त्यांना कोणताही निश्चित आकार नसतो. ते फक्त एकमेकांना चिकटत राहतात. काही वेळाने तेही संपतात. (वाचा - Viral Video: इमारतीला लागली भीषण आग, तरुणांनी जीवावर खेळून वाचवले वृद्धाचे प्राण; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ,Watch)
दरम्यान, फुलांच्या आकाराचा हा दगड नासाच्या शास्त्रज्ञांनी गेल्या आठवड्यातचं पाहिला होता. अखेरीस त्याचे नाव ब्लॅकथॉर्न सॉल्ट ठेवण्यात आले. त्याची प्रतिमा क्युरिऑसिटी रोव्हरवर बसवलेल्या मार्स हँड लेन्स इमेजर (MAHLI) ने घेतली आहे. या कॅमेऱ्यात झूम करण्याची अधिक शक्ती आहे. हे अगदी जवळून छायाचित्रे घेण्यास सक्षम आहे. यामुळे, अनेक दगडांच्या पृष्ठभागावर खनिजे आणि पोत उघड होतात.
लाल ग्रहावर सापडला होता शुक्राणूच्या आकाराचा दगड -
काही दिवसांपूर्वी क्युरिऑसिटी रोव्हरला लाल ग्रहावर शुक्राणूच्या आकाराचा दगड दिसला होता. ज्याबद्दल शास्त्रज्ञांना खूप आनंद झाला. निसर्गाने हा दगड ज्या पद्धतीने कोरला आहे, तो वाखाणण्याजोगा आहे.
Curiosity Finds a Bizarre Rock on Mars that Looks Like a Flower - https://t.co/CKqYn4FUUT By @Nancy_A , images via @MarsCuriosity and @kevinmgill pic.twitter.com/Tu7p9rc8Rf
— Universe Today (@universetoday) February 26, 2022
A Martian Flower 🌻. Imaged by @MarsCuriosity yesterday on Sol 3397 using MAHLI and ChemCam.https://t.co/DIPAVsnUvKhttps://t.co/iPCVDaGK15https://t.co/tCEfaKEvVr pic.twitter.com/6tkRV59Fpl
— Kevin M. Gill (@kevinmgill) February 25, 2022
अलीकडेच मंगळावर मानवी पृष्ठभागाच्या आकाराचा एक दगड सापडला आहे. याचा शोध मार्स पर्सवेरन्स रोव्हरने लावला होता. याआधीही लाल ग्रहावर हिरवा दगड तसेच मासे, माणसांच्या चेहऱ्यांच्या आकाराचे दगड दिसले होते. केविन एम. गिल हे रोव्हरने पाठवलेली खराब झालेली आणि तुटलेली छायाचित्रे एकत्र करून संपूर्ण चित्र तयार करण्याचे काम करतात. अनेकवेळा त्याने अशा गोष्टी शोधून काढल्या आहेत, ज्या पाहून जगाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मंगळावरील चित्रांमधूनही तुम्हाला कदाचित हसू देखील येईल.
1976 मध्ये नासाचे वायकिंग-1 ऑर्बिटर मंगळाभोवती फिरत होते, तेव्हा त्याला ऐतिहासिक असे चित्र दिसले. या चित्रात मंगळाच्या पृष्ठभागावर मानवी चेहरा (गडद वर्तुळात) दिसला होता. याशिवाय नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरला मंगळावर माशाच्या आकाराचा दगड दिसला. त्याचे चित्र समोर येताच परग्रहावर प्रेम करणाऱ्या लोकांनी अनेक प्रकारच्या कथा रचायला सुरुवात केली होती.