Fire Viral Video (PC - Twitter)

Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. यामध्ये अनेक व्हिडीओ खूप मनोरंजक असतात. तर अनेक व्हिडीओ अतिशय भीतीदायक तसेच मानवतेची शिकवण देणारे असतात. सध्या असाच एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तीन तरुण आग लागल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या वृद्धाला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालताना दिसत आहेत.

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने एक वृद्ध व्यक्ती त्यात अडकल्याचे दिसून येते. खोलीच्या समोर आग लागल्याने वृद्धांना दरवाजातून बाहेर पडता येत नाही, म्हणून ते घरात बनवलेल्या बाल्कनीमध्ये येतात. त्यानंतर आग आणखीनचं वाढून बाल्कनीतही पोहोचते. (वाचा - Ukraine Russia Crisis: रिपोर्टरने रशिया-युक्रेन संकट 6 भाषांमध्ये केले कव्हर; सोशल मीडियावर व्हायरल होताय 'हा' व्हिडिओ)

तितक्यात, एक तरुण वेगाने धावत येतो आणि जीव धोक्यात घालून बाल्कनीतून पलीकडच्या बाजूने लटकतो. वृद्धाकडे हात पुढे करतो. परंतु, या वृद्ध व्यक्तीला हात हलवता येत नसल्याचे त्याला दिसून येते. तरुण माणूस काहीही विचार न करता त्याच्या फ्लॅटच्या बाल्कनीत उडी मारतो. दरम्यान, आणखी दोन तरुण पटकन त्या मजल्यावरील फ्लॅटच्या बाल्कनीवर चढतात.

यानंतर व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, तीन तरुणांनी वृद्ध व्यक्तीला यशस्वीरित्या वाचवतात. ते पाहून सगळेच थक्क झाले आहेत. त्याचवेळी माणुसकीच्या उदाहरणावर सर्वजण याकडे पाहत आहेत. हा व्हिडिओ फ्रान्समधील असून जुना आहे. दीपांशू काबरा यांनी पोस्ट शेअर करताना म्हटले आहे की, मानवतेला अजूनही अशा धाडसी आणि दयाळू लोकांची गरज आहे.