Ukraine Russia Crisis: रिपोर्टरने रशिया-युक्रेन संकट 6 भाषांमध्ये केले कव्हर; सोशल मीडियावर व्हायरल होताय 'हा' व्हिडिओ
Reporter covers Russia-Ukraine crisis in 6 languages (PC - Twitter)

Ukraine Russia Crisis: रशिया आणि युक्रेनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनच्या संसदेनेही 24 फेब्रुवारीपासून देशात आणीबाणी लागू करण्याच्या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या या तणावाकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, एका अमेरिकन रिपोर्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. रिपोर्टरने 6 भाषांमध्ये रशिया आणि युक्रेन संकट कव्हर केले आहे. रिपोर्टरच्या या स्टाईलने जगभर मथळे बनवले आहेत. त्याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून त्यावर यूजर्सकडूनही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

या व्हिडीओमध्ये एक रिपोर्टर एक-दोन नव्हे तर 6 भाषांमध्ये हे संकट कव्हर करताना दिसत आहे. या भाषांमध्ये इंग्रजी, लक्झेंबर्गिश, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच आणि जर्मन यांचा समावेश आहे. फिलिप क्राउथर असे या रिपोर्टरचे नाव सांगितले जात असून त्याने स्वत: त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ 2 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. सुमारे एक मिनिटाचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आहे. (वाचा - Ukraine Russia Crisis: रशिया-युक्रेन मध्ये युद्ध अटळ; Russian President Vladimir Putin कडून लष्करी कारवाई करण्याची घोषणा)

रिपोर्टरच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया -

फिलिप क्रॉथरचा हा व्हिडिओ 31 हजारांहून अधिक वेळा रिट्विट झाला असून लाखो वेळा त्याला लाईक करण्यात आले आहे. ज्या प्रकारे रिपोर्टरने रशिया आणि युक्रेनच्या संकटावर वेगवेगळ्या भाषांमध्ये अहवाल दिला, तो खूप लोकप्रिय होत आहे. त्याच्या या व्हिडिओवर नेटिझन्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. या रिपोर्टरचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.