Mumbai: चर्चगेट स्टेशनवर भर  गर्दीत मोटारमॅनचा स्मार्टफोन हातचलाखीने लांबवला  (Viral Video)
Thief flicked motorman mobile at churchgate station (Photo Credits: You Tube)

पश्चिम रेल्वेच्या(Western Railway)  चर्चगेट स्टेशनवर (Churchgate Station)  मोटारमॅन रामचंद्रन यांना कॉफी विकत घेताना भामट्याने लुटले आहे. हातचलाखीने स्मार्टफोन लुटल्याची गोष्ट कॅमेर्‍यामध्ये कैद झाली आहे. सध्या ही एक क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवर आजुबाजूच्या लोकांना हा प्रकार समजू नये म्हणून चोराने एका पिशवीचा वापर केला होता. बिनातिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी पियुष गोयल म्हणतात... 'तेरा टाईम आयेगा!' (Viral Video)

भामट्याने इतक्या हातचलाखीने ही चोरी केली की स्मार्टफोन शर्टच्या वरच्या खिशातून चारचौघात पळवल्याची गोष्ट ना स्टेशनवर कोणाला समजली ना खुद्द रामचंद्रन यांना हा प्रकार लक्षात आला. मात्र सीसीटीव्हीमध्ये हा सारा प्रकार अगदी व्यवस्थित कैद झाला असून चोराचा चेहरादेखील ठळकपणे दिसत आहे.