बिनातिकीट प्रवास करणाऱ्यांसाठी पियुष गोयल म्हणतात... 'तेरा टाईम आयेगा!' (Viral Video)
Gully Boy inspired Tera Time Ayega (Photo Credits: @PiyushGoyal Twitter)

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट स्टारर गली बॉय (Gully Boy) सिनेमातील 'अपना टाईम आयेगा' (Apna Time Aayega) या गाण्याने तरुणाईचे लक्ष वेधून घेतले आहे. तसंच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली आहे. पण या गाण्याची भूरळ केवळ सामान्यांनाच नाही तर खुद्द रेल्वेमंत्री पियुष गोयल (Railway Minister Piyush Goyal) यांनाही पडली आहे.

'अपना टाईम आयेगा' या गाण्याच्या चालीवर 'तेरा टाईम आयेगा' हे नवं गाणं तयार करण्यात आलं आहे. हे गाणं खास रेल्वे प्रवाशांसाठी आहे. या गाण्याचा व्हिडिओ रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केला आहे. यावर प्रतिक्रीयांचा पाऊस पडत असून अनेकांनी हे गाणं शेअर केलं आहे.

बिनातिकीट प्रवास करणे चुकीचं असून तिकीट काढण्यासाठी रांगेत उभे न राहता युटीएस अॅप, एटीव्हीएम या प्रगत सुविधांना प्राधान्य देण्याचा संदेश गाण्यात देण्यात आला आहे.