Mia Khalifa (Photo Credits: Video grab)

XXX पोर्न जगतामधील अन्यायाबद्दल मिया खलिफाने मन मोकळं करत तिची अ‍ॅक्टिव्हिस्टची भूमिका पाहिली होती. पण आता मिया तिच्यासाठी नव्हे तर देशातील शेतकरी आंदोलनाबद्दल ट्वीटर वर घेण्यात आलेल्या भूमिकेमुळे चर्चेमध्ये आली आहे. सध्या नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी 60 दिवसांपासून अधिक काळ शेतकरी विविध बॉर्डर वर आंदोलन करत आहेत. यामध्ये आता शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यामध्ये मिया खलीफा देखील उतरली आहे. Farmer Protest in India: शेतकरी आंदोलनाचा मुद्दा परदेशात गाजला; पॉप स्टार रिहाना नंतर ग्रेटा थनबर्गनेही केलं शेतकऱ्यांचं समर्थन.

26 जानेवारीला शेतकर्‍यांनी दिल्ली मध्ये आपलं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी खास ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केले होते. मियाने ट्वीटर वरून प्रतिक्रिया देताना 'दिल्लीमध्ये इंटरनेट सेवा खंडीत आहे. मानवी हक्कांचं उल्लंघन होत आहे हे काय चाललंय?' अशी प्रतिक्रिया तिने दिली होती. मियाने स्टॉप किलिंग फार्मर्स असा मेसेज असलेला एक फोटो देखील शेअर केला आहे.

मिया खलिफा ट्वीट

मिया खलिफाने अजून एक ट्वीट करत पेड अ‍ॅक्टर्स मला आशा आहे या पुरस्कारांच्या मोसमांमध्ये तुमच्याकडे दुर्लक्ष होणार नाही. मी शेतकर्‍यांसोबत आहे.

दरम्यान काही तासांपूर्वीच आंतरराष्ट्रीय ख्यातीची महिला गायिका रिहाना हीने देखील सीएनएन च्या एका रिपोर्ट द्वारा शेतकरी आंदोलनाचा मुद्दा हाती घेताना दिसली आहे. रिहानाच्या पाठिंब्यानंतर बॉलिवूड कलाकारांनीही त्यांंच्या प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे. स्वरा भास्करने कौतुक केले आहे तर कंगना रनौतने रिहानावर टीकास्त्र डागलं आहे.