Adhara Pérez Sánchez (संग्रहित संपादित प्रतिमा)

जर तुम्हाला विचारले की, जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती कोण आहे? तर नक्कीच तुम्ही अल्बर्ट आइनस्टाईन किंवा स्टीफन हॉकिंग यांचे नाव घ्याल. मात्र मेक्सिकोतील एका ऑटिस्टिक मुलीचे डोके या दोघांपेक्षाही वेगवान आहे. होय, विश्वास ठेवायला कठीण आहे मात्र हे सत्य आहे. या मुलीने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. नासा मध्ये काम करण्याची या मुलीची इच्छा असून तिला नासाची अंतराळवीर व्हायचे आहे.

अधारा पेरेझ सांचेझ (Adhara Pérez Sánchez) असे या 11 वर्षीय मुलीचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी अधाराने बुद्ध्यांक चाचणीत (IQ Test) 162 गुण मिळवून जगाला चकित केले होते. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन आणि स्टीफन हॉकिंग यांच्यापेक्षा तिने दोन गुण जास्त मिळवले होते. अधाराने आपल्या कुशाग्र बुद्धीने या दोन व्यक्तिमत्त्वांना मागे टाकले होते. आयक्यू स्कोअर हा तुमची विचार करण्याची आणि समजून घेण्याच्या क्षमतेची पातळी सांगते. आपले मन एखादे काम किती चांगले करते, एखाद्या समस्येवर आपण किती लवकर आणि कार्यक्षमतेने उपाय शोधू शकतो, हे त्याचे रेटिंग आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गरीब कुटुंबात वाढलेली अधाराची वाढ वेगाने होऊ शकली नाही. ऑटिस्टिक असल्यामुळे तिला शाळेत अनेकदा मारहाण केली जायची. तिचे समवयस्क तिला ‘विचित्र’ म्हणत चिडवायचे, म्हणून तिने शाळेत जाणे बंद केले होते. शिक्षकांनी व्यवस्थित लक्ष दिले नाही, यामुळे तिला तीन वेळा शाळा बदलावी लागली. तिची आई सांगते की, ‘शिक्षकांच्या आणि वर्गातील इतर मुलांच्या वागण्यामुळे अधाराने शाळेत जाणे सोडून दिले होते. मात्र त्यानंतर तिची प्रतिभा समोर आली. (हेही वाचा: Viral Video: चालत्या ट्रेनसमोर इन्स्टाग्राम रील बनवणं 16 वर्षीय मुलाला पडलं महागात; ट्रेनच्या धडकेत गमवावा लागला जीव)

वयाच्या अवघ्या 3 व्या वर्षी अधारा 100 तुकड्यांची कोडी सोडवत होती. अधाराने बीजगणितात प्रभुत्व मिळवले आहे, जे सर्वात कठीण मानले जाते. तिने वयाच्या 8 व्या वर्षी हायस्कूल पास केले. अगदी लहान वयात तिने सिस्टीम्स इंजिनीअरिंग आणि इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवली आहे. मंगळावर वसाहत उभारण्याचे तिचे स्वप्न आहे.