धक्कादायक! PUBG  खेळण्याच्या नादामुळे प्रेग्नेंट पत्नीला सोडले
PUBG (Photo Credit: File Photo)

फावल्या वेळात, मनोरंजनासाठी किंवा स्ट्रेस फ्री होण्यासाठी अनेकदा तरुणाई मोबाईलवर गेम खेळण्याला प्राधान्य देते. पण गेमच्या आहारी जाणे जीवघेणे ठरु शकते. सतत गेम खेळण्याच्या सवयीमुळे शारीरिक-मानसिक आरोग्यावर तर परिणाम होतोच. पण यामुळे तुमची नातीही दुरावली जातात. असा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या ऑनलाईन गेम पबजीचे (PUBG) वारे सगळीकडे वाहू लागले आहेत. या वाऱ्याच्या लहरीत अनेकजण गुरफटले गेले आहेत. असाच एक पबजीने वेडावलेल्या एका व्यक्तीने आपल्या प्रेग्नेंट पत्नीला सोडून दिले. (PUBG: बोर्ड परीक्षा जवळ येत असल्याने पबजीवर बंदी घाला, विद्यार्थी संघटनेची मागणी)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही महिन्यांपूर्वी या व्यक्तीने आपल्या प्रेग्नेंट पत्नीला सोडून दिले. याचे कारण म्हणजे त्याला पबजी खेळण्यासाठी अधिक वेळ हवा होता. या बेजबाबदार व्यक्तीच्या कारनाम्यांचा खुलासा एका फेसबुक पोस्टद्वारे करण्यात आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र या पोस्टमध्ये त्या व्यक्तीबद्दल अधिक काही माहिती देण्यात आलेली नाही. (PUBG खेळणाऱ्यांसाठी खुशखबर; गेम खेळून जिंका 1 कोटी रुपये)

व्हायरल फेसबुक पोस्टनुसार, ही व्यक्ती कायम पबजी खेळण्यात गुंग असते. त्यामुळे त्याला पत्नी, कुटुंबियांसाठी वेळ मिळत आहे.

पबजीची क्रेझ तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर असून हा गेम सातत्याने खेळल्यामुळे एका जीम ट्रेनरचं मानसिक संतुलन बिघडलं. तर पबजी खेळण्यासाठी महागडा मोबाईल न मिळाल्यामुळे एका मुलाने आत्महत्या केली. अशा प्रकारच्या धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहे. पबजीमुळे झालेली तरुणाईची अवस्था पाहता महाराष्ट्रातील एका तरुणाई मुख्यमंत्र्यांना पबजीवर बंदी घालण्याचे आवाहन करणारे पत्र लिहिले होते.

पबजी हा गेम सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च झाला. त्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून हा गेम संपूर्ण जगभरात लोकप्रिय झाला.