PUBG Ban साठी 11 वर्षीय विद्यार्थ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,विनोद तावडे यांच्या सह सरकारला 4 पानी पत्र
PUBG Mobile - Representation Image (Photo Credits: Twitter)

PUBG Ban: सध्या जळी स्थळी काष्ठी पाषाणी फक्त पबजी (PUBG) या ऑनलाईन चर्चा आहे. तरूणाईला वेड लावणार्‍या खेळाचे धोके ओळखून एका 11 वर्षीय विद्यार्थ्याने चक्क सरकारकडेच पबजी खेळावर बंदी घालण्यासाठी मागणी केली आहे. आहाद असं या मुलाचं नाव असून त्याने पबजी हा खेळ काही मानसिक आणि शारीरीक आरोग्याला धोकादायक असल्याचं,हिंसा (violence) सायबर बुलिंग, (cyber bullying) सांगत यावर बंदी आणा अशी मागणी करण्यासाठी चार पानी पत्र लिहलं आहे. गुजरात : विद्यार्थ्यांमधील PUBG Addiction रोखण्यासाठी सरकारचे शाळेत खेळावर बंदीचे आदेश

आहाद या मुलाने पबजी हा ऑनलाईन खेळ हिंसा, सायबर बुलिंग, क्रुरता, राग, लूटमार, ऑनलाईन गेमिंग अ‍ॅडिक्शन या भावनांना प्रोत्साहन देते असे म्हटले आहे. सरकारकडे पबजी खेळावर बंदी आणण्याची मागणी करताना त्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यासह सात जणांकडे याबददल तक्रार करून खेळावर बंदीची मागणी केली होती. मात्र सरकारकडून किंवा या मंत्र्यांकडून कोणताच रिप्लाय न आल्याने अखेर न्यायालयात जनहित याचिका (Public Interest Litigation) दाखल करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

पबजी या खेळाबद्दल देशभरात पालक, शिक्षक चिंतेमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील नुकत्याच झालेल्या परीक्षा पे चर्चा या खास कार्यक्रमामध्येही पालक आणि विद्यार्थ्यांना खास  सल्ला  दिला आहे. अस्तित्त्वाची लढाई अशा थीमवर पबजी हा खेळ आखाण्यात आला आहे.

यंदाचा सर्वोत्तम खेळ म्हणून याला गूगल अवॉर्डही मिळाला आहे. मात्र आता परिक्षांचा काळ जवळ आल्याने या खेळाच्या नादापायी विद्यार्थ्यांचं अभ्यासाकडे होणारं दुर्लक्ष पालकांसाठी चिंतेचा विषय बनत चालला आहे.