मुंबई (Mumbai) येथे एका 19 वर्षीय मुलाने घरातील मंडळींशी पबजी (PUBG) खेळण्यासाठी स्मार्टफोनच्या मुद्द्यावरुन भांडण झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर पोलिसांनी या घटनेची अपमृत्यू म्हणून नोंद दाखल केली आहे.
नादिम शेख (Nadeem Sheikh)असे या तरुणाचे नाव आहे. तर नादिम हा कुर्ला येथील नेहरु नगर येथे राहत होता. तसेच नादिम हा पेशाने सेल्स एक्झिक्युटिव्हचे काम करत होता. नादिमला पबजी गेम खेळण्यासाठी विशिष्ठ मोबाईल हवा होता. त्यासाठी त्याने घरातील मंडळींकडे तो स्मार्टफोन घेऊन देण्यासाठी सातत्याने मागणी करत होता. तसेच त्या स्मार्टफोनची किंमत 37,000 रुपये एवढी होती. परंतु मोठ्या भावाकडे नादिमने स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी पैसे मागितले. त्यावरुन दोन्ही गुरुवारी (29 जानेवारी) भावंडात भांडण होऊन मोठ्या भावाने नादिमला फक्त 20,000 रुपये देतो असे सांगितले. तरीही नादिम त्याच्याकडे पूर्ण पैसे देण्यासाठी मागणी करु लागला आणि लवकरच पैसे परत करीन असे ही मोठ्या भावाला सांगितले.(हेही वाचा-SSC परीक्षेचा अभ्यास पूर्ण झाला नाही, विद्यार्थिनीची गळफास लावून आत्महत्या)
मात्र, घटनेनंतर रात्री 2 वाजताच्या सुमारास घरातील मंडळी झोपली. तरीही नादिम हा मोबाईल वर गेम खेळण्यात वस्त होता. परंतु पहाटे 4 वाजता नादिमचा मोठा भाऊ वॉशरुमला जाण्यासाठी उठला तेव्हा त्याला नादिमने सिलिंकच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पाहिली. या प्रकरणी घरातील मंडळींना नादिमच्या या प्रकारामुळे मोठा धक्का बसला आहे.