Girl commits suicide | (Photo courtesy: archived, edited, representative image)

मुंबईत शुक्रवारी एका दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच या प्रकरणी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून पोलिसात अपमृत्यू म्हणून नोंद दाखल करण्यात आली आहे.

कांदिवली येथे ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात एका दहावीच्या विद्यार्थिनीचा परिक्षेसाठी पूर्ण तयारी न झाल्याचा तणामुळे घरातील सिलिंकला गळफास लावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.काही दिवसांवरच बोर्ड परीक्षा सुरु होणार आहेत. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांकडून परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासाला लागले आहेत.

मात्र या विद्यार्थिनीला बोर्ड परीक्षेचा अभ्यास न झाल्याने ती तणावाखाली गेली होती. गळफास लावून घेतला त्यावेळी घरी कोणीही नव्हते. मात्र घरातील मंडळी बाहेरुन परत आल्यानंतर त्यांनी हा धक्कादायक प्रकार पाहून थक्क झाले. मात्र विद्यार्थिनीने नेमक्या कोणत्या कारणावरुन आत्महत्या केली आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.