Google Play वर PUBG सुपरहिट ! Best Game of 2018 सोबत अन्य 2 किताब पटकावले
PUBG Game (Photo Credits: Twitter)

Google Play Best Of 2018 : ऑनलाईन जगतामध्ये सतत नवनवे खेळ येत असतात. सध्या बहूचर्चित असलेला खेळ म्हणजे PUBG ! Player Unknown's Battle Grounds म्हणजे PUBG या खेळाने सध्या तरुणाईला वेड लावलं आहे. या खेळाची लोकप्रियता यंदा पुरस्कारांमध्येही दिसली.   Google Play's Best Game of 2018 हा मान यंदा PUBG या खेळाला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी अवॉर्ड्सची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये PUBG या ऑनलाईन खेळाने 'Most Competitive Title' आणि 'Fan Favourite'हे दोन किताबदेखील पटकावले आहेत.

 

 

User's Choice category ही यंदा पहिल्यांदाच सुरु करण्यात आली आहे. विजेत्यांची निवड गुगल प्लेवर फॅन्स करतात. भारतामध्ये PUBG Mobile ने User's Choice Game of 2018 हा किताब पटकावला आहे. अमेरिकेमध्ये हा मान YouTube TV app ला मिळाला आहे.

Sensor Tower या रिसर्च फर्मने केलेल्या सर्व्हेनुसार, PUBG ला 240 million डाऊनलोड्स आहेत. यंदाच्या वर्षी 36th Golden Joystick Awards ने देखील खेळाला गौरवण्यात आलं होतं.