Lion-Hyena Encounter: हायना आणि सिंह यांच्यात संघर्ष; वन्यजीवांचे असामान्य वर्तन पाहून अभ्यासकही चक्रावले (Watch Video)
Lion-Hyena Encounter (Photo Credit -Youtbe)

हायना (Hyenas), ज्याला हिंदीत लगडबग्गा आणि मराठीमध्ये तरस असेही म्हणतात. हा हायना आणि सिंह (Lions) यांच्यातील संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. हे दोन्ही वन्यजीव परस्परांवर नेहमीच खार खाऊन असतात. विशेषत्वाने सांगायचे तर, झुंडीने राहणारा हा हायना (Lion-Hyena Encounter) अनेकदा सिंहावर भारी पडल्याचेही पाहायला मिळते. अनेकदा तर सिंहाला स्वत: केलेली हातची शिकारही हायनामुळे सोडावी लागते. असे असले तरी, आफ्रिकेतील नुकत्याच झालेल्या सफारीमध्ये दुर्मिळ आणि गोंधळात टाकणारा प्रसंग घडला आहे. ज्यामुळे वन्यजीव अभ्यासकही चक्रावले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

हायना सिंहाच्या जबड्यात

खरे तर सिंह आणि हायना हे दोन्ही प्राणी नेहमीच परस्परांपासून दूर असतात. पण, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, एका ठिकाणी सिंह आणि सिंहीन विश्रांती घेत असतात. नर आणि मादी सिंह जेथे पहुडलेले असतात तेथेच एक वय झालेला हायना स्वत:हून दाखल होतो. सहाजिकच हायनाला समोर पाहून सिंह आक्रमक पवित्रा घेतो. मादी सिंह तर थेट हल्ला चढवून त्या हायनाला आपल्या जबड्यातही पकडते. अगदीच काही क्षणांची ही घटना. पण विशेष असे की, सिंहाने झडप घातल्यानंतर हायना स्वत:च्या बचावासाठी काहीही करत नाही. प्रत्यक्ष पाहताना असे दिसते की, या हायनाने स्वत:हूनच स्वत:ला सिंहाच्या तोंडी दिले आहे. जसे की, त्याला जगण्याचाच कंटाळा आला होता. (हेही वाचा, How To Open Google 3D Animal: Lion, Giant Panda, Penguin, Tiger यांसारखे प्राणी प्रत्यक्ष पाहण्यास मोबाईलमधील कमी जागेमुळे अडथळा येत असेल तर काय कराल? पाहा सोप्या स्टेप्स)

हायना सोडून सिंहीन निघाली सिंहासोबत

खरी गंमत तर पुढेच घडली. सिंहीणीने आपल्या जबड्यात हायनाला जखडून ठेवले. हायना आपल्या मृत्यूचीच वाट पाहात होता. पण इतक्यात एका रुबाबदार सिंहाचा तिथे प्रवेश झाला. सोबत इतरही काही सिंह होते. पण, त्याला पाहून सिंहिणीने जबड्यात असलेला हायना सहज सोडला आणि ती त्या नर सिंहासोबत चालू पडली. नेमके काय घडले आणि हे असेच का घडले याबाबत उपस्थित पर्यटक आणि अभ्यासकांना प्रश्न पडला. त्यांनी हा काहीसा अनपेक्षीत आणि वेगळाच प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि स्वत:चेच डोके खाजवत निघून गेले.

व्हिडिओ

हायना, लगडबग्गी, तरस

हायना, (कौटुंबिक Hyaenidae), आशिया आणि आफ्रिकेमध्ये आढळणारे खरखरीत, कुत्र्यासारखे मांसाहारी प्राण्यांच्या तीन प्रजातींपैकी एक म्हणून ओळखले जातात. ते त्यांच्या खास शिकार आणि सफाईच्या सवयींसाठी प्रसिद्ध आहे. हायनाची शरीरयष्टी काहीशी विचित्र आणि विशेष असते. त्याचे पुढेच पाय लांब असात. भक्ष्य तोडण्यासाठी आणि वाहून नेण्यासाठी शक्तिशाली मान आणि खांदे असतात. हायना हे मेलेल्या प्राण्याचे मांस खातात. ते स्वत: शिकार करतात पण त्याचे प्रमाण अगदीच कमी असते. ते नेहमी इतरांनी केलेल्या शिकारीवर डल्ला मारतात. अनेकदा ते इतर प्राणांनी शिकार खाऊन पोट भरल्यावर ती तशीच सोडून दिली असता त्यावर गुजरान करण्यास प्राधान्य देतात. त्यांची घ्राणेंद्रीय तीव्र असतात. त्यामुळे ते दुरुनही आपल्या भक्ष्याचा शोध घेऊ शकतात.