
लास वेगास (Las Vegas) येथील एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसते की, एक व्यक्ती स्वयंपाकघरातील मोठा चाकू घेऊन रस्त्यावरील लोकांवर वार (Las Vegas Strip Stabbings Video) करत सुटला आहे. या घटनेत एकूण 8 लोकांवर हल्ला झाला. त्यातील 2 ठार झाले तर उर्वरीत 6 जण गंभीर जखमी आहेत. हल्लेखोर हा एका उपहारगृहात आचारी आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला विचलीत करु शकतात.
पोलिसांनी घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, हल्लेखोरांने दोघांना ठार केले आणि सहा जणांना जखमी केले. सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सकाळी 11.40 च्या सुमारास ही घटना शहरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. (हेही वाचा, Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये गोळीबार, 7 पोलिस आणि महापौरांसह 18 जणांचा मृत्यू)
पोलिसांनी संशयित किंवा संभाव्य हेतूबद्दल कोणतीही माहिती त्वरित जारी केली नाही. साक्षीदारांनी लास वेगास टीव्ही स्टेशनला सांगितले की हल्लेखोराने अनेक ठिकाणी हल्ला केला आणि पीडितांपैकी काही शोगर्ल किंवा स्ट्रीट परफॉर्मर्स असल्याचे दिसून आले जे पट्टीवर पर्यटकांसोबत फोटो काढतात.
पोलिसांनी तपास सुरुच ठेवला असून, अद्यापपर्यंत तरी कोणत्याही प्रकारची प्राथमिक माहिती अथवा हल्लेखोराच्या संभाव्य हेतुबद्दल कोणतीही वाच्यता केली नाही. ही घटान पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हल्लेखोराने अनेकांवर हल्ला केला. काही लोकांनी चपळाईने घटनास्थळापासून पळ काढला. त्यामुळे ते वाचले. हल्ल्यात जखमी झालेले लोक बहुतांश पादचारी अथवा फुटपाथ कलाकार होते.जे देशी विदेशी पर्यटकांसोबत फोटो वैगेरे काढतात.
व्हिडिओ
सांगितले जात आहे की, आरोपी हा आचारी आहे. त्याला हातात चाकू घेऊन काही शोगरल्ससोबत (Showgirls) फोटो काढायचा होता. परंतू त्यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या या आचारी गृहस्थाने हातातील चाकून सर्वांवर हल्ला करण्यास सुरुवात केली, अशी माहिती एका महिलेने KTNV ला सांगितली.