North Korea मध्ये  16 नोव्हेंबर दिवशी असतो मदर्स डे; पण या सेलिब्रेशनवर Kim Jong-un ने घातलीय 'या' कारणासाठी बंदी!
Representational Image (Photo Credits: Getty Images)

Mother's Day in North Korea:  Mother’s Day चं सेलिब्रेशन हे जगभरात करण्याची पद्धत आणि भारतामध्ये करण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. नॉर्थ कोरियामध्ये Kim Jong-un ने 2012 साली 'मदर्स डे' च्या सेलिब्रेशनला सुरूवात केली परंतू 2017 पासून नॉर्थ कोरियामध्ये मदर्स डे सेलिब्रेट करताना खास बुके पाठवणं, मेसेज पाठवणं या परंपरांना छेद देण्यात आलं आहे. त्यामुळे तुम्ही यंदा मदर्स डे च्या शुभेच्छा देऊन 16 नोव्हेंबर दिवशी मदर्स डे साजरा करणं तेथील नियमांच्या विरूद्ध आहे.  North Korea मध्ये आज Mother’s Day 2019 सेलिब्रेशन मध्ये भारतीयांनीही ट्विटरवरच्या माध्यमातून शेअर केल्या मातृदिनाच्या शुभेच्छा, ग्रीटिंग्स.

नॉर्थ कोरियाचे पहिले नेते Kim Il-sung म्हणजेच किम जो यांचे आजोबा यांनी दिलेल्या 1961 च्या भाषणानुसार, "मुलांच्या शिक्षणामधील मातांचे कर्तव्य" म्हणून हा दिवस साजरा करण्यात आला. सुरूवातीला या इव्हेंटला अत्यल्प असा प्रतिसाद होता. मात्र नंतर या मदर्स डे चं सेलिब्रेशन पब्लिक हॉलिडे च्या माध्यमातून करायला सुरूवात झाली. त्यांच्या आईसाठी हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी लोकांना विशेष प्रयत्न करावे लागले. त्यानिमित्त प्रेमाचे, धन्यवाद देणारी फुलांची सजावट पहायला मिळाली.

दोन वर्षांपूर्वी जेव्हा या सेलिब्रेशनमध्ये खंड पडला तेव्हा असं सांगितलं जातं की सत्तेला आणि तेथील कार्यभार पाहणार्‍याला लोकांचं आईबद्दलचं प्रेम हे त्यांच्यावर अंकुश ठेवण्यामध्ये अडथळा ठेवू शकणार्‍यास आडकाठी ठरणारे आहेत हे जाणवल्यानंतर त्यांनी या सेलिब्रेशनवर बंधनं टाकली. या दिवशी आईला मदत करणं, तिला गिफ्ट देणं याच्या माध्यमातून सेलिब्रेशन केलं जातं.

यंदा नॉर्थ कोरियामध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी काय सोय असेल हे माहित नाही पण अजूनही लोकं प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत आहेत.पूर्वी या दिवसाचं सेलिब्रेशन लक्षात घेता परेड निघायची खास सजावट केली आहे.