कोझिकोडे मधील अपतघाचा शेवटच्या क्षणांचा एक व्हिडिओ WhatsApp वर व्हायरल झाला असून तो सिम्युलेटेड मधील असल्याचा PIB चा खुलासा
विमान अपघाताचा व्हायरल करण्यात आलेला व्हिडिओ (Photo Credits-Twitter)

केरळ (Kerala) मधील कोझिकोडे या ठिकाणी विमानतळावर दुबई येथून रवाना झालेले एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 18 जणांसह 2 पायलटांचा सुद्धा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जगभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. याच दरम्यान, सोशल मीडियातील मेसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोझिकोडे मधील विमान अपघाताच्या शेवटच्या क्षणांचा असल्याचे त्या व्हिडिओतून सांगण्यात येत आहे. परंतु हा व्हिडिओ कोझिकोड येथील नसल्याचा खुलासा PIB यांनी खुलासा केला आहे.(Air India flight Skidded Watch Video: केरळमधील कोझीकोडच्या करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, पाहा व्हिडिओ)

PIB महाराष्ट्र यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, व्हाट्सअॅप वर कोझीकोड येथील एअर इंडिया एक्स्प्रेसच्या दुर्घटनेच्या शेवटच्या क्षणांचा व्हिडीओ असे सांगून जो व्हिडीओ प्रसारित होत आहे. तो सिम्यूलेटेड मधील व्हिडिओ असल्याचे स्पष्ट केले आहे. कारणत्यात धावपट्टीवर दोन्ही बाजूला 10 नंबर दिसून येत आहेत. परंतु कोझिकोड मधील धावपट्टीचे नंबर 10/28 असल्याचे सांगण्यात आले आहे.(Kozhikode Plane Crash मध्ये मृत्यु झालेल्या Co- Pilot अखिलेश कुमार यांच्या घरी लवकरच येणार होता चिमुकला पाहुणा; 'ही' कहाणी वाचुन येईल डोळ्यात पाणी)

दुबईहून 191 प्रवाशांना घेऊन आलेले एअर इंडिया एक्स्प्रेसचे विमान केरळमधील कोझिकोडच्या  करीपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना धावपट्टीवरून घसरल्याने शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. यामध्ये 127 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळील रुगणालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले. एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरोया घटनेचा तपास करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.