Kozhikode Plane Crash मध्ये मृत्यु झालेल्या Co- Pilot अखिलेश कुमार यांच्या घरी लवकरच येणार होता चिमुकला पाहुणा; 'ही' कहाणी वाचुन येईल डोळ्यात पाणी
Pilot Akhilesh Kumar Dies In Air India Plane Crash (Photo Credits: ANI)

केरळ (Kerala) येथील कोझिकोड (Kozhikode) मधील करिपूर विमानतळावर  झालेल्या अपघातात वैमानिक दीपक साठे (Deepak Sathe) यांंच्यासोबतच सह वैमानिक अखिलेश कुमार  (Akhilesh Kumar) यांंचा सुद्धा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. अवघ्या 32 व्या वर्षी कर्तव्य निभावत असताना अखिलेश यांंच्यावर काळाने घाला घातला आहे. यानंंतर अखिलेश यांंचे भाउ वासुदेव यांंच्याशी ANI ने संवाद साधला असता त्यांनी आपल्या कुटुंंबावर कोसळलेल्या दुख़ाविषयी सांगितले. अखिलेश यांच्या पत्नी गरदोर असुन अवघ्या दोन आठवड्यात त्यांच्याकडे एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार होते, लॉक डाउनच्या आधी अखिलेश घरी आले असता या बाळाच्या उत्साहात त्यांच्या आनंंदाला पारावार उरला नव्हता मात्र ड्युटीला प्राधान्य देउन त्यांनी घरच्यांचा निरोप घेतला होता, दुर्दैवाने हा अखेरचा निरोप ठरला आणि काल 8 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाल्याचे समजले असे त्यांच्या भावाने म्हंंटले आहे. Sword of Honor असलेल्या वैमानिक दीपक साठे यांचा केरळमधील कोझिकोड येथे Air India विमान अपघातात मृत्यू

प्राप्त माहितीनुसार अखिलेश कुमार हे मूळचा उत्तर प्रदेशातील मथुराचा रहिवासी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मेघा गर्भवती आहेत. या दोघांचे डिसेंबर 2017 मध्ये लग्न झाले. त्यांच्या पश्चात दोन धाकटे भाऊ, एक बहीण आणि त्याचे आईवडील असा परिवार आहे. 2017 मध्ये अखिलेश यांने AIR INDIA जॉईन केले होते, 8 मे रोजी वंंदे भारत मिशन अंतर्गत दुबईतुन भारतीयांंना परत आणणार्‍या विमानात सुद्धा ते वैमानिक होते यावेळी कोझिकोड येथेच विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत झाले होते. यावेळेचा एक व्हिडिओ सुद्धा सध्या ट्विटर वर पाहायला मिळत आहे.

पहा ट्विट

दरम्यान,अन्य पायलट्स साठी अखिलेश हा मित्र 'अखिल' होता ज्याने त्यांना तांत्रिक तपशील प्रभावीपणे समजून घेण्यात मदत केली होती, कमांडर कॅप्टन मायकेल साल्दाना यांनी सुद्धा अखिलेश हा एक प्रामाणिक,नम्र आणि मितभाषी वैमानिक व व्यक्ती होता असे म्हणत त्यांच्या निधनाचे दुःख व्यक्त केले आहे.