केरळ येथील कोझिकोड मधील करिपूर विमानतळावर झालेल्या अपघातात वैमानिक 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' (Sword of Honor) दीपक साठे (Deepak Sathe) यांचे निधन झाले आहे. दीपक साठे (Pilot Deepak Sathe) हे अत्यंत निष्णात वैमानिक होते. त्यांना Sword of Honor आणि विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. एअर इंडियातील एक अनुभवी आणि कुशल वैमानिक अशी त्याची ओळख होती. कर्तव्यावर असताना हातात असलेल्या IX-1344 विमानाला अपघात होण्यापासून वाचविण्याचा दीपक यांनी खूप प्रयत्न केला मात्र, त्यात त्यांना अपयश आले, असे सांगितले जात आहे.
एअर इंडिया कंपनीत सेवा देत असलेले दीपक एक नामांकीत एअरफोर्स अॅकेडमीचे एक होतकरु कॅडेट होते. दीपक साठे यांनी आपल्या कैशल्य आणि कामगिरीच्या जोरावर एअरफोर्सम अॅकेडमीत प्रतिष्ठीत मानला जाणार 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' सन्मानहगी मिळाला होता. एअरफोर्समध्ये नोकरी केल्यानंतर दीपक हे एअर इंडियामध्ये व्यावसायिक सेवेत रुजू झाले होते. (हेही वाचा, Air India flight Skidded Watch Video: केरळमधील कोझीकोडच्या करिपूर विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, पाहा व्हिडिओ)
दीपक साठे हे त्या निवडक वैमानिकांपैकी एक होते ज्यांनी एअर इंडियाच्या एअरबस310 विमान आणि बोइंग 737 विमानांचे उड्डाण केले होते. एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक एअर इंडियातील उत्कृष्ट वैमानिकांपैकी एक होते. कोझिकोड अपघातानंतर त्यांच्या आठवणी सांगताना एअर इंडियाने म्हटले आहे की, आम्ही एक उत्कृष्ठ वैमानिक गमावला आहे.