Balloon Seller Turns Model: फुगे विकणारी मुलगी रातोरात झाली सोशल मीडिया स्टार; एका फोटोने केला चमत्कार, आता बनली मॉडेल (See Photos)
Balloon Seller Turns Model (File Image)

सोशल मीडियाचा (Social Media) योग्य वापर केल्यास कोणाचेही आयुष्य बदलू शकते, याची अनेक उदाहरणे याआधी समोर आली आहेत. सध्या सोशल मिडिया हा अनेक लोकांच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. सोशल मीडिया कोणालाही रातोरात स्टार बनवू शकतो. असाच काहीसा प्रकार केरळमधील किसबू (Kisbu) या फुगे विकणाऱ्या (Balloon Seller) मुलीसोबत घडला आहे. एका छायाचित्रकाराने किसबूला रस्त्यावर फुगे विकताना पाहिले. त्याने तिचे काही फोटो क्लिक केले. आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर किसबू इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. सध्या किसबू केरळमधील एक मॉडेल आहे.

मूळची राजस्थानची असलेल्या किसबूच्या मेकओव्हर आणि ग्लॅमरस लूकने खळबळ माजवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, केरळमधील अंदालूर कावू महोत्सवादरम्यान, किसबू तेथे फुगे विकत होती. छायाचित्रकार म्हणून काम करणारा पयन्नूर येथील अर्जुन कृष्णन हा कार्यक्रम कव्हर करत होता. यादरम्यान फोटोग्राफरची तिच्यावर पडली. ती दिव्यांच्या प्रकाशात फुगे घेऊन उभी होती. फोटोग्राफरला किसबूचा लूक आवडला आणि त्याने लगेच तिचे काही फोटो क्लिक केले. (हेही वाचा: पुण्यातील Prachi Dhabal Deb ने बवलेल्या Biggest Royal Icing Structure ची World Book of Records मध्ये नोंद; 100 किलो केक बनवून केला जागतिक विक्रम)

 

View this post on Instagram

 

A post shared by Spot News 18 (@spotnews18)

 

View this post on Instagram

 

A post shared by PHOTO MAN (@photoman_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by PHOTO MAN (@photoman_official)

अर्जुनने किसबू आणि तिच्या आईलाही त्याने काढलेले फोटो दाखवले. फोटो पाहून दोघींनाही खूप आनंद झाला. परंतु त्यावेळी या फोटोंच्यामुळे आपले नशीब पालटणार आहे याची कसबूला कल्पना नव्हती. फोटो काढल्यानंतर अर्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर किसबूचा फोटो शेअर केला. त्याच्या पोस्टला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्याच्या मित्रांनी किसबूचे फोटो शेअर केले. काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले आणि किसबू इंटरनेट सेन्सेशन बनली.

 

View this post on Instagram

 

A post shared by PHOTO MAN (@photoman_official)

त्यानंतर किसबूचा मेकओव्हर आणि फोटोशूटसाठी लोकांनी कुटुंबाशी संपर्क साधायला सुरुवात केली. एका स्टायलिस्टने किसबूचा मेकओव्हर केला. स्टायलिस्टने केरळच्या पारंपरिक लूकमध्ये किसबूचा मेकओव्हर केला. यामध्ये तिने लाल ब्लाउज आणि ऑफ-व्हाइट साडी परिधान केली होती. आता किसबूच्या ट्रान्सफॉर्मेशनच्या फोटोंनाही लोक पसंती देत ​​आहेत.