पुण्यातील आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेती केक आर्टिस्ट प्राची धबल देब (Prachi Dhabal Deb) हिचे सर्वत्र कौतूक होत आहे. या केक आर्टिस्टने तयार केलेल्या 100-किलो व्हेगन रॉयल आयसिंग स्ट्रक्चर'चा लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड' (World Book of Records) मध्ये समावेश करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त, देब यांनी आणखी एक विजेतेपद जिंकले आहे. दुसरा विक्रम तिने जास्तीत जास्त संख्येचे 'शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्चर्स'ची निर्मिती करून केला आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करून तिने यासंदर्भात माहिती शेअर केली आहे.
रॉयल आयसिंग हे एक अतिशय क्लिष्ट कुकिंग स्किल आहे. ज्यामध्ये प्राचीने प्रभुत्व मिळवले आहे. युनायटेड किंगडममधील जगप्रसिद्ध केक मेकर आयकॉन सर एडी स्पेन्स एमबीई यांच्याकडून प्राचीने ही कला आत्मसात केली आहे. (वाचा - Viral Video: रहाट पाळण्यात बसायला खूपचं उत्सूक होता मुलगा, उंचावर पोहोचल्यावर ओरडायला लागला मम्मी-पप्पा; पहा मजेशीर व्हिडिओ)
अलीकडेच प्राचीने या दिशेने एक नवीन यश मिळवले आहे. रॉयल आयसिंग बनवण्याच्या क्षेत्रात तिच्या क्षमतेच्या जोरावर तिने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे. हा सन्मान तिला शाकाहारी पदार्थांपासून बनवलेल्या 100 किलोच्या भव्य कॅथेड्रल (चर्च) केकच्या रॉयल आयसिंग रचनेसाठी देण्यात आला.
पहा व्हिडिओ -
View this post on Instagram
View this post on Instagram
तिच्या या विक्रमाबद्दल बोलताना प्राचीने सांगितलं की, गेल्या काही वर्षांत मी माझ्या कामात खूप मेहनत घेतली आहे. मला खूप आनंद होत आहे की, माझ्या कामाची सर्वत्र दखल घेतली गेली. विशेषतः, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स हा पुस्कार मिळाल्याने मला ओळख मिळाली. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे एखाद्या स्वप्नासारखे आहे. या प्रतिष्ठित सन्मानासाठी मी या संस्थेची खूप आभारी आहे.
View this post on Instagram
या केकची लांबी 6 फूट 4 इंच, उंची 4 फूट 6 इंच व रुंदी 3 फूट 10 इंच आहे. ब्रिटीश शाही कुटुंबासाठी केक डिझाईन करण्यासाठी वापराला जाणारा हा अत्यंत अवघड कलाप्रकार आहे. प्राचीचे काम अतुलनीय आहे. रॉयल आणि आकर्षक दिसणाऱ्या बेक केक बनवण्यात तिने मोठ नाव कमावलं आहे. लोक तिला 'क्वीन ऑफ रॉयल आयसिंग' या उपमाने देखील संबोधतात. तिने जगभरातील सुप्रसिद्ध कलात्मक रचनांपासून प्रेरणा घेतली असून या रचना ती स्वतःच्या केक डिझाइनमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे.