Viral Video: रहाट पाळण्यात बसायला खूपचं उत्सूक होता मुलगा, उंचावर पोहोचल्यावर ओरडायला लागला मम्मी-पप्पा; पहा मजेशीर व्हिडिओ
रहाट पाळण्यात बसलेला मुलगा (Photo Credits: Instagram)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा एका विशाल रहाट पाळण्यात बसला आहे. दोन दिवसांपूर्वी 'गिदे' पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एक मुलगा दाखवण्यात आला आहे, जो महाराष्ट्रातील एका यात्रेमध्ये रहाट पाळण्यात बसला आहे. रहाट पाळणा सुरू होईपर्यंत मुलगा खूप उत्साहात होता. परंतु, रहाट पाळणा जस-जसा उंच जायला लागतो, तसं-तसा मुलगा ओरडू लागतो. त्याला खाली कोसळण्याची भीती वाटू लागते.

मग तो घाबरलेल्या अवस्थेत 'जय महाराष्ट्र! हर हर महादेव! जय बजरंग बली' अशी प्रार्थना करतो. त्यानंतर तो पूर्णपणे वेडा होतो आणि त्याच्या वडिलांचे तसेच कुटुंबातील इतर सदस्यांची नावे घेतो. पप्पा-मम्मी, काका, बाबा वाचवा, अशी हाक मारतो. मला खाली उतरा...मला खाली उतरायचयं असं म्हणतो. (वाचा - Triple Marriage: तरुणाची विचीत्र हॅटट्रीक, एकाच वेळी 3 बहिणींशी केला विवाह, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या)

 

View this post on Instagram

 

A post shared by GiDDa CoMpAnY (@giedde)

या पोस्टला 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नेटिझन्सना हा व्हिडिओ खूपचं आवडला असून ते या व्हिडिओवर कमेंट्स देत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, या मुलाला पाहून त्यांना त्यांचे दिवस आठवत आहेत.