Farmer singing a Justin Bieber song (Photo Credits: YouTube Grab)

जस्टिन बिबर या हॉलिवूड गायकाला 'बेबी' या इंग्रजी गाण्यामुळे जगभरात ओळख मिळाली आहे. 9-10 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. देशा-परदेशात लोकांनी या गाण्याला डोक्यावर उचलून धरलं आहे. दरम्यान सध्या इंटरनेटवर कर्नाटकातील एक शेतकरी जस्टिनचं हेच 'बेबी' गाणं खास अंदाजात गातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार या शेतकरी गायकाचं नाव प्रदीप असून तो कर्नाटकातील चित्रदुर्ग या जिल्ह्यातील शेतकरी आहे. मात्र ज्या अंदाजात तो जस्टीनचं गाणं गुणगुणत आहे त्याचं सोशल मीडीयामध्ये कौतुक होत आहे. आता रानू मंडलला विसरा; व्हायरल होत आहे 2 वर्षांच्या चिमुरडीने गायलेले लता मंगेशकर यांचे 'हे' अवघड गाणे (Video)

सध्या सोशल मीडीयामध्ये ग्रामीण भागातील हौशी गायकांचे व्हिडिओ व्हायरल होण्याचा हा पहिलाच नमुना नव्हे. काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे रानू मंडल लोकप्रिय झाली तिला बॉलिवूडमध्ये ब्रेकदेखील मिळाला. तर शंकर महादेवन यांनी शास्त्रीय गाणं गाणार्‍या एका आजोबांचा आवाज ऐकून त्यांना शोधण्याचं अवाहन केलं होतं. दरम्यान या शेतकरी गायकाचा अंदाजही तशाप्रकारे सोशल मीडीयामध्ये धुमाकूळ घालत आहे. मग पहा या शेतकरी गायकाच्या अंदाजातील 'बेबी' गाणं

मीडियाला दिलेल्या माहितीमध्ये प्रदीप फार स्वच्छ इंग्रजी बोलत नाही पण त्याला ऐकून ऐकून चायनीज आणि जपानी गाणीदेखील येतात. बोलता येत नसलं तरीही केवळ गाण्याची धून ऐकून ते आत्मसाद करण्याचा प्रयत्न प्रदीप शेतीची कामं करताना करतो. यामधूनच त्याला वेगवेगळ्या भाषेतील गाणी गाता येतात.