दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स (Jonty Rhodes) यांनी ट्विटरवर एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये लोकांचा ग्रुप क्वारंटाइन केंद्रात (Quarantine Centre) क्रिकेट खेळताना दिसत आहेत. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनीही हाच व्हिडिओ यापूर्वी ट्विट केला जेणेकरून हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. दरम्यान, रोड्सने व्हिडिओ शेअर करून त्याचे “भारतावर” इतके प्रेम का आहे हे उघड केले. "लोकं मला बर्याचदा विचारतात; 'भारताबद्दल (India) असं काय आहे जे मला आवडते', मला आणखी काही बोलण्याची गरज आहे?" जॉन्टी रोड्सने ट्विटरवर या व्हिडिओला कॅप्शन दिले. भारत आणि त्याच्या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या रोड्स यांनी त्याच्या मुलीचे नाव 'इंडिया' ठेवले आहे. हा व्हिडिओ पाहून क्वारंटाइनमध्ये असलेल्या लोकांच्या मनात या लढाई विरोधात लढण्यासाठी एक नवीन जोश तयार होईल. भारत उर्वरित देशांप्रमाणेच कोरोना व्हायरस विरोधात मजबुतीने लढा देत आहे आणि मार्चपासून स्पर्धात्मक क्रिकेट ठप्प झाले आहे. (बेळगाव: खेळण्याच्या नादात मुलाने पकडला साप; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद Watch Viral Video)
बुधवारी ओमर अब्दुल्ला यांनी व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले "जागा आहे, खेळूया. क्वारंटाइन टाइम पास." तथापि, हा व्हिडिओ केव्हा आणि कोठे चित्रित केला गेला हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पाहा हा व्हायरल व्हिडिओ:
People ask me often; “what is it about India that I love so much” Need I say any more? https://t.co/QSsQfJOqIl pic.twitter.com/QdzIviTxMT
— Jonty Rhodes (@JontyRhodes8) June 10, 2020
ओमर अब्दुल्लाह यांचे ट्विट
Have space, will play. Quarantine time pass. 🏏 pic.twitter.com/2rYZFUrGVl
— Omar Abdullah (@OmarAbdullah) June 10, 2020
दरम्यान, कोरोना काळात आयसीसीसह अनेक क्रीडा मंडळ क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिका मध्यभागी स्थगित करण्यात आली होती, तर इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) 13 वी आवृत्ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने (आयसीसी) ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक पुढे ढकलला तरच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयपीएल 2020 होण्याची शक्यता आहे. मात्र, आयसीसीने टी-20 वर्ल्डकपबाबतचा अंतिम निर्णय बुधवारी झालेल्या बैठकीत पुढील महिन्यापर्यंत लांबणीवर नेला.