Image For Representations (Photo CreditsL: Unsplash)

व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. जगभरात 14 फेब्रुवारी रोजी प्रेमीयुगुलं आपल्या प्रेमाचे सेलिब्रेशन करतात. ज्यांना चार चौघात आपले प्रेम जाहीर करणे आवडत नाही ते चार भिंतीच्या आत आपले सेलिब्रेशन करतात, अर्थात दोन्हीही व्यक्ती सुज्ञ असतील तर असे करायला काही हरकत नाही, मात्र अनेकदा अशा प्रेमवीरांच्या हरकती सोशल मीडियावर मिम्स आणि जोक्स बनून राहतात, इथवर तरी सर्व काही ठीक आहे, पण आता इंडोनेशिया मधील मकसार या शहरात तर व्हॅलेंटाईन दिवशी हॉटेल मध्ये एकत्र असणाऱ्या प्रेमीयुगुलांवर कारवाई करण्यात आल्याचे समजतेय. मकसार येथील पोलिसांनी 14 फेब्रुवारी रोजी काही हॉटेल्सवर छापा मारत येथून काही अविवाहित जोडप्यांना अटक केल्याचे समजत आहे. यावेळी तब्बल 24 युगुलांना तुरुंगात पोलिसांकडून सेक्स विषयी मोठे लेक्चर देऊन त्यांची शाळा देखील घेण्यात आल्याचे माध्यमांनी म्हंटले आहे.

उत्तर प्रदेश: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करायला आलेल्या पोलिसांना बघून तरुणींनी गच्चीवरून मारली उडी; जागीच मृत्यू

डेली मेलच्या वृत्ताच्या नुसार इंडोनेशिया मध्ये उघडपणे प्रेम व्यक्त करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याच आधारे मकासार आणि डेपो येथील अधिकाऱ्यांना लोकांना जाहीर प्रेम व्यक्त करू देऊ नका असा इशारा देण्यात आला आहे. इंडोनेशिया हा मुळातच मुस्लिम बहुसंख्यांक देश असून हे सर्व प्रकार देशाच्या संस्कृती आणि नैतिकतेच्या विरोधात आहेत असे अधिकार्यांकडून सांगण्यात आले होते. यामुळेच अविवाहितांच्या प्रेमावर अनेक बंधने आहेत, साहजिकच चारचौघात प्रेम व्यक्त करणे याठिकाणी जरा कठीणच आहे, त्यामुळे काही युगुलांनी हॉटेल्सवर आपला व्हॅलेंटाईन साजरा करण्याचे ठरवले असता त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, पोलीस कारवाईत पकडण्यात आलेले काही कपल्स हे तर पर्यटक असल्याचे समजत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या जोडप्याला 'लग्नापूर्वी लैंगिक संबंध ठेवल्याचे नुकसान' या विषयावर भाषण देऊन सोडले. एवढेच नाही तर अटक केलेल्या या जोडप्यांपैकी पाच जणांना पुनर्वसन केंद्रात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सुद्धा मकसार मध्ये कंडोम विक्रीवर सुद्धा अनेक निर्बंध लावण्यात आले होते.कंडोम फक्त विवाहित प्रौढांसाठी आहे त्यामुळे या कॉन्डोम विक्री बाबतचे नियम अत्यंत काटेकोर होते.