इमरान खान (File Photo: IANS)

गूगल (Google) या जगभरातील अग्रगण्य सर्च इंजिन गूगल वर 'भिखारी'(Bhikari) टाईप केल्यास पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांचा फोटो दिसत आहे. गूगल इमेजवर हातामध्ये कटोरी घेऊन असल्याचा फोटो दिसत आहे. हा फोटो एडिट केलेला असून इम्रान खान रस्त्यावर बसलेले दाखवण्यात आले आहेत. सध्या पाकिस्तान समोर आर्थिक संकट आहे. त्यामधून मार्ग काढण्यासाठी, कर्ज घेण्यासाठी सध्या इमरान खान अनेक देशांचा दौरा करत आहे. गूगल वरील इमरान खानच्या सर्च रिझल्टचा आता सोशल मीडियामध्येही पाऊस पडत आहे.

इमरान खान यांच्यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्च रिझल्ट 'इडियट' म्हणून आला होता. याप्रकरानंतर अमेरिकेने गूगलला अशा सर्च रिझल्ट बद्दल प्रश्न देखील विचारले होते. Idiot सर्च केल्यावर का दाखवला जातो Donald Trump यांचा फोटो, Sundar Pichai यांनी दिले स्पष्टीकरण

इमरान खान यांच्या 'भिखारी' पोस्ट मिम्स

इमरान खान याच्या भिखारी सर्च रिझल्टवर सध्या खूप चर्चा रंगल्या आहेत. अनेकांनी पाकिस्तानच्या सध्याच्या स्थितीवर यावरून टीका केली आहे. पुलवामा येथील भारतीय जवानांवरील भ्याड हल्ल्यानंतर भारत-पाक संबंध ताणले गेले आहेत. जगभरातून पाकिस्तानवर टीका होत आहे.