राजस्थान मध्ये काम करणार्या एका ब्रिटीश समाजसेवकाने ' देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा पुरेपूर अनुभव घेतला आहे. जीवघेणा कोरोना वायरस (Coronavirus), मलेरिया (Malaria), डेंगी (Dengue) नंतर आता क्रोब्रा (Cobra) सारख्या विषारी अजगराच्या डंख या एकापाठोपाठ आजारपणावर मात तो पुन्हा उभा राहिला आहे. Ian Jones असं त्याच नाव असून जोधपूर मध्ये त्याला कोब्रा डसला. त्याला जयपूर या राजधानीच्या शहराच्या 350 किमी दूर एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
Medipulse Hospital मध्ये उपचार घेताना सुरूवातीला डॉक्टर्सना वाटलं जोनसला पुन्हा कोविड 19 ची लागण झाली असेल पण त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह होता. डॉक्टरांशी बोलताना तो शुद्धीमध्ये होता. अंधुक दिसणं, चालताना त्रास होणं अशी सर्पदंशाची त्याची लक्षणं होती. त्याला हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आल्याची माहिती डॉक्टर Abhishek Tater यांनी AFPशी बोलताना दिली आहे.
जोनस यांचा मुलगा Seb Jones याने GoFundMe वर एक पोस्ट लिहून मदत मागितली आहे. त्यामध्ये तो लिहतो, 'बाबा फायटर आहेत. भारतामध्ये असताना त्यांनी आधीच कोविड 19 पूर्वी मलेरिया आणि डेंगीचा सामना केला आहे. त्यांना परत Isle of Wight in southern England मध्ये घरी परतायचं आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आणि मेडिकल बिल्ससाठी मदत करा असं त्याने आवाहन केले आहे. 'कुटुंब म्हणून आम्ही त्यांची भारतामध्येच राहून काम करण्याची जिद्द समजू शकतो. पण pandemic च्या काळात ते घरी येऊच शकलेले नाहीत.
जोनस हे राजस्थानमधील पारंपारिक कलाकुसर करणार्यांसोबत काम करतात. त्यांची गरिबी दूर करण्यासाठी राजस्थानमधून ब्रिटनमध्ये वस्तू आयात करतात.