Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला एका पुरुषाला कानशिलात मारताना दिसत आहे. तसेच त्यानंतर ती दुसऱ्या महिलेवर हल्ला करताना दिसत आहे. हा व्हिडिओ @gharkekalesh या X वापरकर्त्याने शेअर केला आहे. पोस्टनुसार, ही घटना नेमकी कुठे घडली हे कळू शकले नाही.
या यूजरने पोस्टला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, पत्नीला तिच्या पतीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर (Extra-Marital Affair) बद्दल माहिती मिळाली. त्यानंतर तिने एका शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Mall) दोघांचा सामना केला. व्हिडिओमध्ये पत्नी पहिल्यांदा पतीला कानशिलात लगावते. नंतर ती तिच्या पतीची मैत्रीण समजल्या जाणाऱ्या दुसऱ्या महिलेचे केस ओढते आणि निघून जाते. नंतर तो पुरुष हल्ला झालेल्या महिलेला उठण्यास मदत करतो. यानंतर ते दोघे घटनास्थळावरून निघून जातात. (वाचा - Viral Video: भटक्या कुत्र्याने केला तरुणावर हल्ला, महिलाने वाचवले प्राण, सोशल मिडीयावर महिलेचे कौतुक)
येथे पहा व्हिडिओ -
Extra-Marital affair kalesh (Wife Caught her Hisband with other lady inside Mall) pic.twitter.com/d1jekkE9os
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) February 29, 2024
उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका महिलेने अलीकडेच तिच्या पतीने तिच्यासाठी मोमो आणणे बंद केल्याने तिने पोलिसांशी संपर्क साधला होता. पतीने पत्नीला आठवड्यातून दोनदा मोमोज देण्याचे आश्वासन दिल्यानंतर या दाम्पत्यातील वाद मिटला होता. मोमो हा भारतातील सर्वात लोकप्रिय स्नॅक्स आहे. मालपुरा येथील तक्रारदाराचे आठ महिन्यांपूर्वी पिनाहाट येथील एका व्यक्तीशी लग्न झाले होते. तिने पोलिसांना सांगितले की, तिला मोमोज खायला खूप आवडतात. तिचा नवरा लग्नानंतर रोज मोमो आणत असे. मात्र, काही दिवसानंतर त्याने मोमोज आणणे बंद केले. यावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.