Husband Forgets Wife on Road trip: लघूशंकेसाठी उतरलेला वेंधळा पती चक्क पत्नीलाच रस्त्यात विसरला; 20 किमी चालल्यानंतर बिचारीला मिळाली मदत
Women | Pixabay.com

थायलंड (Thailand) मध्ये एक पती आपल्या पत्नीला रस्त्यामध्येच विसरून रोड ट्रीप पुढे निघून गेल्याची एक घटना समोर आली आहे. रोड ट्रीप मध्ये लघुशंकेसाठी उतरलेला पती पत्नी रस्त्यातच सोडून पुढे निघून गेला. हा प्रकार ख्रिसमसच्या दिवशी घडला आहे. Boontom Chaimoon आपली पत्नी Amnuay Chaimoon सोबत रोड ट्रीपला निघाला होता. त्यांच्या होम टाऊन मधून ते Maha Sarakham province कडे रोड ट्रिपला निघाले होते. ख्रिसमस आणि नववर्षाचं स्वागत एकत्र जल्लोषात करण्याचं त्यांचं प्लॅनिंग होतं. याच आशेने त्यांनी त्यांचा प्रवास सुरू केला होता. रोड ट्रीपची मज्जा घेत ते निघाले होते.

पहाटे 3 च्या सुमारास ते लघुशंकेसाठी उतरले. 55 वर्षीय व्यक्तीने गाडी रस्त्याच्या कडेला लावून लघूशंका केली. यावेळी तिने पतीला गॅस स्टेशन वर गाडी का थांबवली नाही? हे विचारलं पण पतीकडून उत्तर न आल्याने ती जंगलामध्ये आपली सोय बघायला गेली. पण यामध्ये पतीला पत्नी गाडीमधून उतरली असल्याचा आसभास देखील नव्हता.

Boontom गाडीत बसला आणि त्याने गाडी सुरू केली. त्याला सोबत पत्नी नसल्याचा देखील अंदाज आला नव्हता. Amnuay जेव्हा जंगलातून बाहेर आली तेव्हा तिला पती गाडी घेऊन निघून गेल्याचं आढळून आलं. काळोख्या रात्री महिलेदेखील मदत मिळते का? यासाठी प्रयत्न केले. ती अंदाजे 20 किमी चालत पुढे आली. Kabin Buri मध्ये ती 5 च्या सुमारास आली. तिने स्थानिक पोलिसांची मदत घेतली.

Amnuay ला पतीचा फोन नंबर आठवत नसल्याने स्वतःचा गाडीतील बॅगेत असलेल्या मोबाईल वर देखील फोन केला. पण तो फोन उचलला गेला नाही. सकाळी 8 च्या सुमारास पोलिसांच्या मदतीने तिचा पतीसोबत संपर्क झाला. तो पर्यंतही पतीला आपल्या सोबत पत्नी नसल्याचं कळलंच नव्हतं.तोपर्यंत तो सुमारे 159.6 किमी पुढे निघून गेला होता.