आजकाल रील बनवण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की, तरुणाई यासाठी कोणतेही धाडस करायला तयार आहे. यासाठी अनेकजण आपला जीवही धोक्यात घालत आहेत. आता उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये तरुणांचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. याठिकाणी एक-दोन नव्हे तर चक्क सात युवक एका चालत्या दुचाकीवर बसलेले दिसून आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सातव्या तरुणाला दुचाकीवर बसण्यासाठी जागा न मिळाल्याने मागे बसलेल्या एका तरुणाने त्याला खांद्यावर घेतले आहे. तरुणांच्या या धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून लोक सुरक्षेवर आणि पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. हा व्हिडीओ हापूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन हद्दीतील काठीखेडा येथील आहे. (हेही वाचा: Girls Fighting Video: सेम ड्रेस वरून 2 मुली एकमेकींना भिडल्या (Watch Video)
एक बाइक पर सात सवार,वायरल वीडियो हापुड़ की है!@hapurpolice pic.twitter.com/1xvMm1RgGO
— rajni singh (@imrajni_singh) August 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)