Bengaluru Stunt Video: बंगळुरूमध्ये (Bengaluru) शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक स्टंट करताना (Stunt Video) दोन जण दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर सुरक्षिततेचे पाऊल उचलत बंगळुरू पोलिसांनी दोघांवर कडक कारवाई केली आहे. बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एकजण स्कूटी चालवताना दिसतो. तर, दुसरा स्कूटीवर मागे बसलेला आहे. स्टंट करताना पुढचा व्यक्ती स्कूटीचे पुढचे चाक हवेत उचतो आणि मागच्या चाकाच्या आधारेच स्कूटी चालवतो. त्यामुळे मागे बसलेला व्यक्ती मागे झुकताना दिसतो. कारवाई करताना पोलीस संबंधित व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करतात. त्याशिवाय, व्हिडीओ शेअर करताना "बेंगळुरूचे रस्ते सुरक्षित राईड्ससाठी आहेत, स्टंट शोसाठी नाहीत!" या कॅप्शनसह कडक कारवाईचा इशारा देतात. (Viral Video: रीलसाठी काहीही! व्हिडीओसाठी तरुणीने मुख्य रस्त्यावर केले जीवघेणे स्टंट, व्हिडीओ व्हायरल)

बेंगळुरूमध्ये वर्दळीच्या रस्त्यावर दोघांची स्टंटबाजी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)