Gujarat Samachar Newspaper Shows 8000 People per 1 Lakh Population Infected by COVID-19 in India (Photo Credits: Twitter, @PIBAhmedabad)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव भारतात वाढू लागला तेव्हापासून कोविड 19 (Covid 19) संबंधित अनेक फेक न्यूज, चुकीची माहिती वेगाने पसरु लागली. सोशल मीडियाच्या विविध माध्यमात म्हणजेच फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (Whatsapp) यावर व्हायरल होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे लोकांच्या मनातील भीती वाढते. या फेक न्यूज (Fake News) मध्ये सातत्याने नवी भर पडत असते. अलिकडेच गुजरातमधील एका आघाडीच्या वृत्तपत्राच्या एका चुकीमुळे लोकांच्या अस्वस्थतेत अधिकच भर पडली. गुजरात समाचार (Gujarat Samachar) या गुजराती वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात एका लाखामागे 8000 लोक कोरोना बाधित आहेत. (Fact Check: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची WHO चे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती? जाणून ज्या व्हायरल बातमी मागचे सत्य)

मात्र प्रेस ब्युरो ऑफ इर्फोमेशनने (Press Information Bureau) या मागील सतत्या सांगितली आहे. गुजरात समाचारने दिलेली ही बातमी खोटी आणि चुकीची आहे. ही निव्वळ अफवा आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे 1 लाखामागे 8.3 लोक कोरोना बाधित आहेत, अशी माहिती PIB ने दिली आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, लाखामागे 4.2 लोकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. तर देशात लाखामागे 0.2 इतका मृत्यूदर आहे.

PIB Tweet:

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात मागील 24 तासांत 6088 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यात 148 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 118447 पोहचला आहे. त्यापैकी 66330 रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह असून 3583 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान 48533 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत.