कोरोना व्हायरस (Coronavirus) सारख्या विषाणूची लढण्यासाठी देशात युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र अशा परिस्थितीत सोशल मिडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरवण्याचे काम देखील सुरु आहे. यामुळे लोकांच्या मनात खूप गोंधळ उडाला आहे. कोरोना सारखे संकट देशासमोर असताना अशा बातम्यांमुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसत आहे. अशातच आणखी एक नवीन बातमी सध्या व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना WHO नवे प्रमुख बनवल्याची. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ही बातमी प्रंचड व्हायरल होत आहे.
काय आहे ही बातमी:
फेसबुकवर व्हायरस झालेल्या बातमीत असे सांगण्यात आले आहे की WHO ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नवे प्रमुख बनवले असल्याची घोषणा केली आहे. या संघटनेची सर्व सूत्रे 22 मे पासून मोदींच्या हातात म्हणजेच भारताकडे असतील. त्यानंतर मोदी चीनला आपल्या रडारवर ठेवतील. कोरोना सारख्या महाभयाण विषाणू विरोधात लढण्यासाठी गुप्तता पाळण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि अन्य देशाच्या दिग्गज नेत्यांनी कोरोना व्हायरस चीनच्या वुहान लॅबमध्ये बनवला होता का असा प्रश्न विचारला आहे. तसेच चीनच्या जिनपिंग सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. Fact Check: स्थलांतरित कामगार म्हणून ट्रेनच्या बोगीतून एक महिला बाळासह प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, जाणून घ्या सत्यता
सत्य:
या बातमीमागचे सत्य पडताळून पाहिल्यानंतर असे दिसून आले की अशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे WHO नवे प्रमुख झाल्याची घोषणा झालेली नाही. तसेच WHO कडून या पदासाठी कोणतीही नवी निवडणूक वा नियुक्ती प्रक्रिया चालू नाही आहे. खरे पाहता, कोणतेही पंतप्रधान किंवा राष्ट्रपती जागतिक स्तरावरील संघटनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले जाऊ शकत नाही.
दरम्यान, लॉकडाउनचे आदेश जाहीर करण्यात आल्यानंतर काही समजाकंटकांकडून सोशल मीडियात अफवा आणि खोटी माहिती पसवली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून आरोपींच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे सोशल मिडियावरील अशा बातम्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यामागची सत्यता जाणून घ्या असा सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.