Sri Lanka's ex-minister eating 'raw fish' | (Photo Credits: YouTube/Screengrab)

श्रीलंकेचे माजी मत्स्यव्यवसाय मंत्री दिलीप वेदाराराची (Dilip Wedaarachchi ) यांनी थेट पत्रकार परिषदेत "कच्चा मासा" खाऊन सर्व पत्रकारांना चकित केले. दिलीप वेदाराराची यांच्या या कृतीमागे कारणही तसंचं होतं. कारण, कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये समुद्री खाद्यांविषयी अफवा पसरल्या आहेत. या अफवा दूर करण्यासाठी वेदाराराची यांनी भर पत्रकार परिषदेत कच्चा मासा खाल्ला. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. खालील व्हिडिओमध्ये आपण 13:52 मिनिटांपासून वेदाराराची यांना कच्च्या माशाचा तुकडा खाताना पाहू शकता.

या बैठकीत माजी मंत्र्यांनी श्रीलंकेतील मच्छिमारांच्या दुर्दशाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोविड संसर्गाची वाढ आणि साथीच्या भीतीमुळे सर्व मच्छिमारांना प्रचंड आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. कोरोनाचा संसर्ग असणाऱ्या अनेक भागातील माशांच्या बाजारपेठा सरकारने बंद केल्या होत्या. ज्यानंतर संपूर्ण देशात चूकीची अफवा पसरविली गेली. सीफूडद्वारे कोरोनाचा संसर्ग होत असल्याचा दावा या अफवाद्वारे करण्यात आला होता. (हेही वाचा - Fact Check: 'स्त्री स्वाभिमान योजने'अंतर्गत केंद्र सरकार महिला बँक खात्यात 1 लाख 24 हजार रुपये जमा करीत आहे? PIB ने केला खुलासा, जाणून घ्या)

व्हिडिओ येथे पहा:

माशापासून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याच्या भीतीने श्रीलंकेच्या रहिवाशांना समुद्री अन्न सोडण्यास भाग पाडले आहे. हा तेथील रहिवाशांच्या दैनंदिन आहाराचा मुख्य भाग आहे. या सर्वांच्या दरम्यान सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की, कोरोना विषाणू माशाद्वारे पसरत नाही.

दरम्यान, या पत्रकार परिषदेत माजी मंत्र्यांनी राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील सरकारला समुद्राच्या अन्नाविषयी पसरलेली चुकीची माहिती दूर करण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले. साथीच्या रोगामुळे आर्थिक पिळवणूक झालेल्या मच्छिमारांना शासनाने मदत करावी असे आवाहनही विरोधी पक्षांनी केले आहे.