सहा महिन्यात उडणार Ex Porn Star मिया खलिफाच्या लग्नाचा बार; प्रियकर रॉबर्टशी अडकणार विवाहबंधनात, गरोदरपणाविषयी मोठे विधान
मिया खलिफा (Photo Credits: Instagram)

अडल्ट फिल्म इंडस्ट्रीत (Adult Film Industry) मोठे नाव कमावल्यानंतर मिया खलिफा (Mia Khalifa) त्यातून बाहेर पडली. त्यांनतर मिया गेली कित्येक महिने आपल्या बॉयफ्रेंडसोबत आनंदाने आपले जीवन व्यतीत करीत आहे. आता मिया खलिफाने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षी मार्चमध्ये मियाने तिचा प्रियकर रॉबर्ट सँडबर्गशी (Robert Sandberg) साखरपुडा केला होता. त्यानंतर 2021 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता असे काही घडले आहे की, येत्या सहा महिन्यात मिया लग्न करणार आहे. पुढच्या उन्हाळ्यात म्हणजेच येत्या 6 महिन्यांत मिया आणि रॉबर्टच्या लग्नाचा बार उडणार आहे.

लग्न प्री-पोन्‍ड झाल्याने अनेकांनी मिया गर्भवती आहे का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली होती. त्यावर मियाने आपण गर्भवती नाही से उत्तर दिले आहे. मिया खलिफाने पॉर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर आपण रॉबर्ट सँडबर्गबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचा खुलासा इंस्टाग्रामवर केला होता. आता मियाने आपला लग्नाचा निर्णय चाह्त्यांसोबत शेअर केला आहे. मियाने एका ट्वीटद्वारे सांगितले आहे की, पूर्वीच्या योजनेनुसार आपले लग्न 2021 मध्ये नाही, तर पुढच्या वर्षाच्या उन्हाळ्यात होणार आहे. यासह मियाच्या घरी लग्नाची तयारी जोरदार सुरु असल्याची माहिती तिच्या ट्वीटद्वारे मिळत आहे.

(हेही वाचा: XXX स्टार मिया खलिफा हिने केली Engagement, इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करुन चाहत्यांना दिली आनंदाची बातमी)

आपण आपल्या प्रियकराच्या करियरसोबत आपले आयुष्य जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. यामुळे लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याची माहिती मियाने दिली आहे. हे मियाचे दुसरे लग्न असेल. यापूर्वी तिने 2011 मध्ये तिच्या एका शाळेतील मित्राशी विवाह केला होता. मियाचे पहिले लग्न फक्त 5 वर्षे टिकले. घटस्फोट झाल्यावर मियाने काही अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले.