अखेर 157 वेळा ड्रायव्हिंगसाठी परिक्षा दिल्यानंतर Learner Test मध्ये मिळाले यश
Photo Credit : pixabay

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे आपण बऱ्याचदा ऐकले असेल मात्र आलेले अपयश पचवणे हे तितकेच कठिन देखील आहे.बऱ्याचदा एखाद्या गोष्टीत सारखे अपयश आले तर आपण वैतागून ती गोष्ट करणे सोडून देतो.मात्र सतत न थकता प्रयत्न केले तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो  हे इंग्लंड मध्ये राहणाऱ्या एक व्यक्तिने सिद्ध करुन दाखवले आहे. इंग्लड मधील एका व्यक्ती ड्रायविंगच्या लेखी परीक्षेत तब्बल 157 वेळा नापास झाला मात्र त्याने त्याचे प्रयत्न सोडले नाहीत आणि शेवटी 158 व्या वेळी तो त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला.  (Baby Elephant Adorable Video: सकाळी आपल्या बाळाला झोपेतून उठविण्यासाठी हत्तिणीने केले असे काही जे पाहून तुमच्याही बालपणीच्या आठवणी होतील ताज्या )

158 वेळा परीक्षा दिल्याच्या आतपर्यंतच्या अर्ज करण्यासाठी त्याचे जवळ जवळ 3 लाख रुपये खर्च केले आहेत. शेवटी आता लेखी परीक्षेत जरी तो पास झाला असला तरीही जेव्हा प्रॅक्टिकल परीक्षेत दाखवण्याची गरज येईल तेव्हा त्याचे काय होईल देवच जाणे. ड्रायव्हिंग आणि वाहन मानक एजन्सीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ड्रायविंग परीक्षेत नापास झालेल्या व्यक्तींपैकी आतापर्यंत देशातील दुसर्‍या क्रमांकावर आहे 30 वर्षाची महिला जिने आतापर्यंत 117 वेळा ही परीक्षा दिली असून अजूनही टी उत्तीर्ण होऊ शकलेली नाही.आणि तिसऱ्या क्रमांकावर 48 वर्षीय महिला आहे जी शेवटी तिच्या 94 व्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली. आणि प्रक्टिकल परीक्षांबद्दल बोलायचे झाले तर 72 वर्षांच्या इंग्लिशमैन आहे 43 प्रयत्नांनंतर तो  आपला परवाना मिळविण्यास यशस्वी झाला , तर 47 वर्षांची स्त्री जी अद्याप 41 प्रयत्न करूनही उत्तीर्ण झालेली नाही. ( World's Dangerous Selfie Spots: जगातील 'या' सर्वात धोकादायक सेल्फी पॉइंट बद्दल तुम्हाला माहीत आहेत का? )

सिलेक्ट कार लीजिंगचे संचालक, मार्क टोंगू म्हणाले,“जर सुरुवातीला तुम्ही यशस्वी झाला नाही तर प्रयत्न करा आणि सतत प्रयत्न करत रहा कारण आपली ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण होणे हे जीवनातील सर्वात कठीण आव्हान असू शकते.”ते असे ही म्हणतात की, तुम्ही 157 वेळा नापास जरी झालात तरी पुन्हा नव्याने प्रयत्न करण्यात काहीच शरम वाटण्याचे कारण नाही'.