Female Elephant (Photo Credits: Twitter)

सध्या लहान मुले लॉकडाऊन छान एन्जॉय करतात. मात्र त्यांची शाळा जरी सुरु नसल्या तरी ऑनलाईन क्लासेस मात्र सुरु आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठणे हे ओघाओघाने आले. तसं सकाळी आपल्या मुलांना झोपेतून उठविण्यासाठी तमाम मातांना अगदी तारेवरची कसरत करावी लागते. आपल्या मुलांना उठविणे हे प्रत्येक आईसाठी हे मोठे आव्हानच असते. मग त्यासाठी आलार्म लावणे, घड्याळ अर्धा तास लवकरचे करुन ठेवणे, त्यांच्या डोळ्यांवर पाणी शिंपडणे अशा नानात-हा कराव्या लागतात. मात्र त्याहून पलीकडे एक हत्तिणी (Female Elephant) आपल्या बाळाला उठविण्यासाठी काय काय करते हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

या व्हिडिओमध्ये हत्तिणी आपल्या छोट्या बाळाला पायाने उठविताना दिसत आहे. यात तिचे बाळही उठण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मधेमधे ती सोंडेचाही वापर करताना दिसत आहे.हेदेखील वाचा- Dog Giving Blessings Viral Video: सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक च्या एक्झिट गेट भाविकांना 'आशिर्वाद' देणार्‍या कुत्र्याच्या अंदाजावर नेटकरी फिदा ( Watch Video)

यातही बाळही झोपलेल्या अवस्थेत हळूहळू उठण्याचा प्रयत्न करत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. थोडक्यात बाळाला झोपेतून उठविणे हे केवळ सर्वसामान्य स्त्रियांसाठी तर प्राणिमात्रांनीही हा मोठा प्रश्न नेहमी भेडसावत असतो हेच या व्हिडिओवरुन दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवरी एका युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ 2000 हून अधिक व्हयूज मिळाले असून अनेक लाईक्स देखील मिळाले आहेत.