ट्रॅव्हल सेल्फीज आता एक ट्रेंड झाला आहे. सोशल मीडिया वर असे अनेक ट्रॅव्हल सेल्फी तुम्हाला पहायला मिळतील. पण अशा ट्रॅव्हल सेल्फीची एक वेगळी बाजू ही आहे.. गेल्या काही वर्षात अशी नोंद आहे की गेल्या काही वर्षांमध्ये धोकादायक ठिकाणी सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्नकरत असताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे. जरी, सेल्फीज आपल्याला आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण कॅप्चर करण्यात मदत करतात, परंतु काही फोटो काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालणे कितपत योग्य आहे? ( Kashmir च्या बर्फाच्छादित रस्त्यांवर Amazon Delivery Boy घोडेस्वारी करत पोहचवतोय पार्सल; Viral Video मधून समोर आली व्यवसायातील कल्पकता )
आज आपण असे काही स्पॉट्स पाहणार आहोत ज्यांचा सामावेश जगातील सर्वात धोकादायक सेल्फी पॉइंट मध्ये होतो.
पॅम्पलोना, स्पेन (Pamplona, Spain)
बुल्स फेस्टिव्हलच्या होस्टिंगसाठी पॅम्पलोना प्रसिद्ध आहे.हे फेस्टिव्हल आधीपासूनच भयंकर आहे कारण या फेस्टिवल मध्ये बैलांसमवेत धावणे सामिल आहे.काही जण त्या धावत्या बैलांसमवेत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांचे आणि इतर सहभागींचे जीवन धोक्यात येते. यावर तोडगा म्हणून तेथील अधिकाऱ्यांना नवीन कायदा करावा लागला. जेथे या कार्यक्रमादरम्यान सेल्फी क्लिक करताना लोकांना 4,000 डॉलर्सपेक्षा अधिक दंड आकारला जाऊ शकतो.
माउंट हुआ, चीन (Mount Hua, China)
7087 फूट उंच डोंगराच्या कडेला लाकडाच्या फळ्या लावलेल्या माउंट हू चीनमधील लोकप्रिय सेल्फीचे ठिकाण बनले आहे. या ठिकान धोकादायक सेल्फी पॉइंट मध्ये येते. तरीही लोक इथे फक्त सेल्फी क्लिक करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात या ठिकाणी 100हून अधिक अपघात झाले आहेत.
किलाउआ, हवाई(Kilauea, Hawaii)
हवाई मधील माउंट किलॉआच्या नुकत्याच झालेल्या विस्फोटमुळे सोशल होऊ लागली मिडीयावर ते चांगलेच चर्चेत आले. पण अजुन एक चर्चा होऊ लागली ती म्हणजे त्या विस्फोटाच्या ज्वालामुखीचा सेल्फी.ते हवाई द्वीपसमूहातील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असल्याने, बर्याच दिवसांपासून उत्सुक प्रवाश्यांसाठी हे आकर्षण केंद्र होते. पण काही काळानंतर जेव्हात्याचा उद्रेक होऊ लागले तेव्हा तिथली धोक्याची पातळी देखील बरीच वाढली.
प्लिटवाइस लेक्स नॅशनल पार्क, क्रोएशिया (Plitvice Lakes National Parks, Croatia)
नियाग्रा फॉल्स आणि व्हिक्टोरिया फॉल्ससारख्या जगातील सर्वात तीव्र धबधब्यांशी तुलना केली असता प्लिटविस लेक्स नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध कासकेड तुलनेने हार्मलेस वाटू शकतात.तरीही, लोक फक्त त्यांच्या इन्स्टाग्राम फीडवर फोटो टाकण्यासाठी अनावश्यक जोखीम घेतात आणि मरण पावतात अशा बातम्या आल्या आहेत.
ग्रँड कॅनियन,यूएसए (ग्रँड कॅनियन, यूएसए)
अॅरिझोनाचे नैसर्गिक आश्चर्य, ग्रँड कॅनियन बर्याच ट्रॅव्हलरच्या बकेट-लिस्टमध्ये आहे.दुर्दैवाने, दरवर्षी 12 जणांचा मृत्यु या ठिकाणी होतो. काहींचा उष्णतेमुळे तर काहींचा राफ्टिंग ट्रिपमध्ये बुडण्यापर्यंमुळे. अशी बरीच वेगवेगळी कारणे आहेत.