Fact Check: NRA कडून 8 लाखाहून अधिक पदांसाठी परीक्षा न घेता नोकरभरती? PIB ने केला खुलासा
Fake Viral Post (Photo Credits: PIB Fact Check/Twitter)

सरकारी नोकरी (Government Job) मिळवण्याचे स्वप्न उराशी बाळगत अनेकजण त्यांच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. परंतु, अशातच सोशल मीडियावर एक बातमी जोरदार व्हायरल होत आहे. यात राष्ट्रीय भरती एजन्सी (National Recruitment Agency) नोकरीशिवाय भरती करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तब्बल 8 लाखांहून अधिक पदांसाठी परीक्षेशिवाय भरती करण्यात येणार आहे, असा दावा करणारा युट्युब व्हिडिओ (YouTube Video) समोर आला आहे. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आहे. दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या व्हायरल व्हिडिओमागील सत्याचा खुलासा केला आहे.

व्हायरल व्हिडिओ मधील दावा: एका युट्युब व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की राष्ट्रीय भरती एजन्सीने 8 लाखाहून अधिक पदांसाठी परीक्षेशिवाय भरती काढली आहे.

पीआयबी फॅक्ट चेक: हा दावा फेक आहे. राष्ट्रीय भरती एजन्सीने कोणत्याही प्रकारच्या सरकारी पद भरतीसाठी जाहीरात जारी केलेली नाही.

Fact Check By PIB:

व्हायरल व्हिडिओमधील दावा फेक आणि निराधार असून अशा प्रकारची नोकरभरती NRA कडून करण्यात येत नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. व्हायरल फेक न्यूजमागील सत्याचा उलघडा पीआयबी फॅक्ट चेकद्वारे सातत्याने करत असते. तसंच खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात येते.