कोविड-19 (COVID-19) महामारी (कोरोना व्हायरस इन्फेक्शन) बद्दल अनेक प्रकारच्या बनावट बातम्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या बनावट बातमी मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात आहेत. अलिकडच्या काळात भारत सरकार (Indian Government) सरकारी कर्मचार्यांचे पेन्शन 30 टक्के कमी करण्याचा विचार करीत असल्याची अफवा पसरली जात आहे. काही माध्यमांनी दावा केला आहे की कोविड-19 चा भारतात प्रसार वाढल्यामुळे निवृत्त सरकारी कर्मचार्यांच्या निवृत्तीवेतनात 30 टक्के कपात केली जाईल आणि 80 वर्षांवरील सरकारी कर्मचार्यांची संपूर्ण पेन्शन वजा केली जाईल. सरकार याच्या तयारीत असल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (PIB) या वृत्तांना बनावट म्हणून फेटाळले आहे. (Coronavirus Lockdown बाबत WHO Protocol वेळापत्रकाबाबतचे WhatsApp Message खोटे! जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य)
हा दावा फेटाळून लावताना प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (पीआयबी) एक तथ्य तपासणी अहवाल पाठविला जो @COVIDNewsByMIB यांनी शेअर केला होता. "सरकारकडून असे कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नाही," असे त्यात म्हटले गेले आहे.
इथे पाहा वस्तुस्थितीची तपासणीः
Claim: Media reports & rumours are circulating that Govt. intends to reduce pensions of govt employees by 30% & terminate it altogether for those above age of 80, in the wake of #COVID19
Fact: This is fake, there is no such move by Govt.
Via @PIBFactCheck
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) April 9, 2020
"दावाः माध्यम अहवाल आणि अफवा पसरवित आहेत की कोविड-19 नंतर सरकारी कर्मचार्यांचे पेन्शन 30 टाके कमी करावे आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना हे पूर्णतः संपुष्टात आणण्याचा सरकारचा विचार आहे. तथ्यः सरकारने असे कोणतेही पाऊल उचलले नाही आणि ही एक अफवा आहे,"एमआयबीने ट्विट केले.
देशात कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. भारतात आतापर्यंत 5700 हून अधिक लोकांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. भारतात या साथीच्या आजारामुळे दीडशेहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या अफवा देखील पसरत आहेत, पीआयबी या अफवांचे तथ्य तपासात आहे.