Coronavirus Lockdown बाबत WHO Protocol वेळापत्रकाबाबतचे  WhatsApp Message खोटे! जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य
WhatsApp Fake Message on Lockdown Extention (Photo Credits: File Photo)

दिवसेंदिवस कोरोना व्हायरसबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे भारतीयांमध्ये कोव्हिड 19 आजाराबाबत भीती वाढते आहे. जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्‍या क्रमांकावर असणार्‍या भारत देशात 4000 पेक्षा अधिक कोरोनाबाधित तर 100 पेक्षा अधिक जण कोव्हिड 19 आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. अशा प्रसंगामध्ये आता खोट्या बातम्या, अफवा यांना देखील Facebook, WhatsApp,Twitter अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पेव फुटतो. यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण होते. सध्या कोरोना बाबत व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत असलेल्या नव्या अफवेनुसार, जागतिक आरोग्य संघटना (WHO)ने COVID-19 lockdown बाबत खास वेळापत्रक जारी केलं आहे. या फेक मेसेजनुसार आता भारतामधील लॉकडाऊन आता जून 2020 पर्यंत वाढवला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. भारत देश कोरोनामुक्त कधी होणार? देशातील Lockdown महत्त्व आलेखांच्या माध्यामातून समजून घेत जाणून घ्या COVID-19 मधून आपली कधी पर्यंत होऊ शकते सुटका?

व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या व्हायरल होत असलेला हा दावा खोटा आहे. WHO कडून अद्याप लॉकडाऊनबाबत कोणतेही वेळापत्रक जारी करण्यात आलेले नाही. सध्या जागतिक आरोग्य संघटनेच्या वेळापत्रकाचे मेसेज फेसबुकवरही पसरवले जात आहेत. यामध्ये लॉकडाऊन कसा आणि किती वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं आणि देश कोरोनामुक्त होऊ शकतो असं म्हटलं आहे. मात्र हा दावा खोटा आहे.

WHO चं स्पष्टीकरण

सोशल मीडियामध्ये पसरवले जाणारे खोटे मेसेज

WHO च्या South East Asia भागातील कार्यालयातून अशाबाबतच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. त्यामुळे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर, फेसबूक वॉलवर येणार्‍या बातम्यांना सरकरी यंत्रणेकडून दुजोरा मिळाल्याशिवाय त्याला फॉरवर्ड करणं, त्यावर विश्वास ठेवणं टाळा.

भारतामध्ये 25 मार्चपासून सुरू झालेला लॉकडाऊन 14 एप्रिल पर्यंत प्रस्तावित आहे. हा लॉकडाऊन 15 ला संपणार का? पुढे कायम राहणार का? महाराष्ट्रात लॉकडाऊनबाबत काय निर्णय होईल? या प्रश्नांची अद्याप सरकारी यंत्रणांनी उत्तरं दिलेली नाही. एकूणच कोरोना व्हायरसबाबत स्थिती पाहुन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. मात्र सध्या 14 एप्रिल पर्यंत नागरिकांना संचारबंदी असल्याने घरातच राहणं अनिवार्य आहे.