देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. त्यांच्या संघर्षाची कहाणी शतकानुशतके देशातील पिढ्यांसाठी प्रेरणा राहील. कलाम हे देशातील प्रत्येक मुलासाठी एक आदर्श आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्या संघर्षाशी संबंधित अनेक प्रकारच्या कथा सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. अत्यंत गरीब कुटुंबातील कलाम सक्षम वैज्ञानिक व देशाचे राष्ट्रपती बनले.आजही त्यांच्या कुटुंबियांबद्दलची एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.कलाम यांचा भाऊ छत्री दुरुस्तीचे छोटे दुकान चालवित आहे, असा दावा चित्रात केला जात आहे.आणि त्याचे फोटो ही व्हायरल होत आहेत. (PIB Fact Check: 'एक परिवार एक नोकरी' योजना अंतर्गत खरंच केंद्र सरकार गर्व्हमेंट जॉब देणार? जाणून घ्या वायरल मेसेज मागील सत्य)
सोशल मिडीयावर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होणारा हा फोटो ज्यात एक माणूस छत्री दुरुस्तीच्या दुकानात बसला आहे. तो 104 वर्षीय इसम माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचा मोठा भाऊ आहे, मोहम्मद मुथु असे त्याचे नाव असून ते अजूनही छत्री दुरूस्तीचे दुकान चालवून स्वत:चा कमवत आहेत.अशी माहिती पसरत आहे मात्र त्यांच्या भावाबद्दलचे व्हायरल होणारे फोटो खरे आहेत का आणि हीच सत्य परिस्थिती आहे का? जाणून घेऊयात या फोटो मागची खरी कथा.
या गोष्टीची पडताळणी केली असता व्हायरल पोस्टचे सर्व दावे खोटे ठरले आहेत.कलाम यांचे नातू आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी एपीजेएमजे शेख सलीम यांनी स्वत: माध्यमांशी बोलून हा दावा नाकारला. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो डॉ. कलाम यांच्या भावाचा नाही किंवा त्यातील लिहिलेली माहिती सत्य नाही.सलीम यांच्या म्हणण्यानुसार डॉ. कलाम यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथु मराकायर हे 102 वर्षांचे आहेत, यापूर्वी त्यांनी छत्री दुरुस्तीचे दुकान कधीच चालवले नव्हते. ते व्यवसायाने शेतकरी आहेत आणि शेती करून आपले घर चालवित आहे.डॉ. कलाम हे त्यांच्या चार भाव आणि एका बहिण यांमध्ये सर्वात धाकटे होते. डॉ कलाम व्यतिरिक्त त्यांचे दोन इतर भाऊ यांचेही निधन झाले आहे. आता फक्त मोठा भाऊ व बहीण हयात आहेत.