Fact Check: कोविडवरील लस 'COVISHIELD' 73 दिवसात होणार उपलब्ध? सीरम इंन्स्टीट्युट ऑफ इंडिया यांनी दिले 'हे' स्पष्टीकरण
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-IANS)

Fact Check: कोरोना व्हायरस संबंधित रोज नव्याने काही गोष्टी समोर येत आहेत. याच दरम्यान आता असे बोलले जात आहे की, कोविड19 वरील लस कोविशिल्ड ही 73 दिवसात बाजारात उपलब्ध होणार आहे. यावर आता सीरम इंन्स्टिट्युट ऑफ इंडिया यांनी रविवारी स्पष्टीकरण दिले आहे. मीडियात कोविशिल्ड बद्दल मीडियात करण्यात येणारे दावे आणि अनुमान पूर्णपणे चुकीचे आहेत. त्याचसोबत केंद्र सरकारने सुद्धा फक्त लस बनवण्यास परवानगी दिली आहे. भविष्यात याच्या उपयोगासाठी साठवणूक करण्यास सांगितले आहे. SII ने मीडिया रिपोर्ट्स चुकीचे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, काही मीडिया कंपन्यांनी असा दावा केला होता की, 73 दिवसात कोविड19 वरील कोविशिल्ड उपलब्ध होणार आहे. परंतु या दाव्याचा हवाला देत सीरम इंन्स्टिट्युशन ऑफ इंडिया यांनी एक विधान जाहीर करत म्हटले आहे की, कोविशिल्डच्या संदर्भात करण्यात येणारे दावे पूर्णपणे चुकीचे आहेत. सध्या सरकार लस बनवण्याकडे लक्ष देत असून त्यासाठीच परवानगी दिली आहे.(Fact Check: आर्थिक अडचणीमुळे 2020-21 मध्ये कर्मचाऱ्यांना पगार न देण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय? PIB ने केला खुलासा)

ऑस्फोर्ड-अॅस्ट्रोजेनच्या लसीचे पैलू बद्दल सांगत एसआयआय यांनी त्यांच्या विधानात म्हटले की, ऑक्सफोर्ड अॅस्ट्रोजेन लससाठी तिसऱ्या टप्प्यात चाचणी सुरु आहे. परंतु जेव्ही ही लस रोगप्रतिकार आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाल्यास याबद्दल एसआयआय याच्या उपलब्धतेबद्दल अधिकृतपणे पुष्टी करेल.

लक्षात असू द्या, सीरम इंन्स्टिट्युट ऑफ इंडिया सध्या भारतात 17 विविध ठिकाणी त्यांची लस कोविशिल्ड च्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिकनिकल ट्रायल करत आहे. यामध्ये चंदीगढ स्थित असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च यांचा सुद्धा समावेश आहे.