Fact Check: 10 वी आणि 12 वी च्या 2021 बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी 33 टक्के गुणांऐवजी 23 टक्के केल्याची पोस्ट व्हायरल, जाणून घ्या सत्यता
Fact Check (Photo Credits: PIB)

Fact Check:  कोरोनाच्या काळात सोशल मीडियात खोट्या बातम्या तुफान व्हायरल होत आहेत. या बातम्यांवर विश्वास ठेवणे थोडे मुश्किलच असते. अशातच सोशल मीडियात गृह मंत्रालयाने शाळा आणि महाविद्यालये पुन्हा एकदा बंद करण्याबद्दल आदेश दिले आहेत. दरम्यान पीआयबी फॅक्ट चेक मध्ये हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. आज सोशल मीडियात या पद्धतीची आणखी एक बातमी समोर आली आहे. त्यानुसार, 10 वी आणि 12 वी 2021 च्या बोर्ड परीक्षेत पास होण्यासाठी 22 टक्के गुणांऐवजी 23 टक्के अनिवार्य असल्याचे म्हटले गेले आहे. याच मुद्द्यावरुन आता पीआयबी फॅक्ट चेक कडून व्हायरल पोस्ट मागील सत्यता समोर आणली आहे.

पीआयबी फॅक्ट चेकच्या व्हायरल पोस्ट मध्ये सतत्या आहे की नाही ते तपासले असता ते खोटे असल्याचे समोर आले. या संदर्भात PIB Fact Check कडून एक ट्विट सुद्धा केले गेले आहे. त्यात असे लिहिले आहे की, हा दावा खोटा असून @EduMinOfIndia ने अशी कोणतीच घोषणा केलेली नाही. त्याचसोबत बोर्ड परीक्षेच्या उत्तीर्ण गुणांसाठी कोणताच बदल केलेला नाही.(Fact Check: सरकारी कर्मचाऱ्यांना Encashment ऐवजी वर्षाला 20 Earned Leave घेणे बंधनकारक? जाणून घ्या व्हायरल बातमी मागील सत्य)

Tweet:

व्हायरल झालेल्या पोस्ट नंतर स्पष्ट झाले की, बोर्ड परीक्षेतील उत्तीर्ण गुणांबद्दल कोणताच बदल करण्यात आलेला नाही. आधीपासूनच प्रत्येक विषयात 33 टक्के गुण अनिवार्य आहे. आता कोणत्याही विषयात पास होण्यासाठी तेवढ्याच गुणांची आवश्यकता असणार आहे. यासाठीच सोशल मीडियात व्हायरल होणाऱ्या अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.