Etihad Airbus A380 विमान युकेच्या हॅथ्रो विमानतळावर (Heathrow Airport) लॅन्ड करताना एका बाजुला झुकल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये चांगलाच व्हायरल होत आहे. मागील काही दिवसांपासून युरोपामध्ये Dennis वादळ घोंघावत आहे. सोशल मीडीयावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नुसार, पायलटने वार्याचा दबाव असल्याने विमान एका बाजूला झुकतं असलं तरीही प्रसंगावधान साधत आणि स्वतःचे कौशल्य लावून विमानाचं लॅन्डिंग केले आहे. ब्रिटिश मिडियानेही याबाबतचे वृत्त रविवारी प्रसिद्ध केले आहे. बर्मिघम एअरपोर्टवर वादळात अडकलेल्या विमानाचं 'असं' झालं लॅडिंग; पहा थरारक व्हिडिओ.
दरम्यान शनिवारी (15 फेब्रुवारी) वादळामुळे अनेक विमानाची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान easyJet ने सुमारे 230 विमानं रद्द केली आहेत. या वादळामुळे विकेंडला युकेमध्ये वारा जोराने वाहत होता तसेच पाऊस देखील बरसला आहे. महिन्याभरापेक्षा अधिकचा पाऊस मागील दोन दिवसांतच झाला आहे. दरम्यान इंग्लंडमध्ये पूराचा अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. रविवारी 594 ठिकाणी पूराचा अलर्ट देण्यात आला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी बर्मिघम एअरपोर्टवर वादळात अडकलेल्या विमानाचं लॅडिंग करतानाची दृश्य टिपण्यात आली होती. त्यावेळी विमानाचा लॅडिंगचा थरारक व्हिडिओ पाहून अंगावर शहारे येत आहेत अशा प्रतिक्रिया आहेत.