हत्तीच्या समजूतदारपणाचे अनेक दाखले यापूर्वी समोर आले आहेत. यापूर्वी सोशल मीडियाद्वारे समोर आलेल्या अनेक व्हिडिओतून किंवा गोष्टींवरुन अडचणीत मदत करणारा, संवेदनशील, भावूक अशी हत्तीची ओळख निर्माण झाली आहे. आपल्या साथीदारांना मदत करणारा, त्यांच्या आठवणीत अश्रू ढाळणार हत्ती यापूर्वी आपण पाहिला आहे. आता हत्तीचा एक इंटरेस्टिंग व्हिडिओ समोर आला आहे. यात एक हत्ती नदी बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवताना दिसत आहे. हा व्हिडिओ ए पेज टू मेक यू स्माईल अगेन या ट्विटर अकाऊंट वरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
हत्तीला वाटले की, ही व्यक्ती बुडत आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी तो पुढे आला, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. 26 मार्चला हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत या व्हिडिओला 22.3K व्ह्युज मिळाले असून 426 लोकांनी रिट्विट केले आहे. तर दीह हजाराहून अधिक लोकांनी व्हिडिओ लाईक केला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हत्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पहा व्हिडिओ:
The elephant thought the human was in trouble so came over to save him 🙏😍❤️ pic.twitter.com/vsZl9JeIVL
— ❤️A page to make you smile again ❤️ (@HopkinsBRFC) March 26, 2021
व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की. एक व्यक्ती नदीच्या वाहत्या प्रवाहात पोहत पुढे पुढे जात आहे. त्याचवेळेस नदीच्या किनाऱ्यावर काही हत्ती उभे आहेत. त्यातील एका हत्तीची नजर पाण्यातील व्यक्तीकडे जाते. त्या हत्तीला वाटते की तो व्यक्ती बुडत आहे. म्हणून त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी हत्ती नदीच्या प्रवाहात उतरतो आणि त्या व्यक्तीच्या दिशेने जातो. व्यक्तीजवळ पोहचताच तो पायात व्यक्तीला पकडतो आणि सोंडेने थोपवून धरतो. हत्तीचे हे वागणे नक्कीच कौतुकास्पद आहे.