Viral Video: हत्ती आणि कुत्र्याची ही घट्ट मैत्री पाहून 'शोले' चित्रपटातील गाण्याची येईल आठवण, पाहा मजेशीर व्हिडिओ
Elephant And Dog (Photo Credits: Twitter)

सध्याच्या कलियुगात कौटुंबिक कलहामुळे रक्ताची नाती तुटतात आणि माणसे मनाने आणि शरीराने देखील दुरावत आहे. अशा परिस्थितीत हत्ती आणि कुत्र्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही त्यातून काही बोध घ्या. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये हत्ती आणि कुत्रा (Elephant And Dog) एकमेकांसोबत छान खेळताना दिसत आहे. गवतात पडलेला लाकडाच्या तुकडा आपल्या सोंडेने फेकून कुत्रा तो फेकलेला तुकडा पकडण्यासाठी सैरावैरा पळताना दिसत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला शोले चित्रपटातील गाण्याची आठवण आल्याखेरीज राहणार नाही.

या व्हिडिओमध्ये हा कुत्रा हत्तीसोबत छान खेळताना दिसत आहे. हत्ती देखील कुत्र्यासोबतचा हा मजेशीर खेळ छान एन्जॉय करताना दिसत आहे. इतकंचट काय तर व्हिडिओच्या शेवटी हा कुत्रा झोपलेल्या हत्तीच्या पोटावर अगदी शांत बसलेला दिसत आहे.हेदेखील वाचा- आकाशात उंच उडणाऱ्या गरुडाने समुद्रातील माशाची अशी केली शिकार; पहा थक्क करणारा Video

हा व्हिडिओ 'एंड अॅनिमल' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 97हजारांहून अधिक व्हयूज आणि 6.4 हजारांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

या अकाउंटवरुन अनेकदा अशा पद्धतीने प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडिओज शेअर होत असतात. तसे पाहायला गेले तर, हत्ती आणि कुत्र्याला सर्वात समजदार प्राणी म्हणून नेहमी उल्लेख केला जातो. त्यामुळे त्यांचे मैत्रीचे घट्ट नाते या व्हिडिओमधून दाखविण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.