आकाशात उंच उडणाऱ्या गरुडाने समुद्रातील माशाची अशी केली शिकार; पहा थक्क करणारा Video
Eagle Viral Video | (Photo Credits: Twitter)

आकाशत उंच झेपावणाऱ्या गरुड (Eagle) पक्षाला तीक्ष्ण दृष्टीचे वरदान लाभले आहे. उंच आकाशातूनही त्याला पाण्यात पोहणारा मासा अचूक दिसतो आणि तो क्षणातच त्याची शिकार करतो. हे आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल. पाहण्याचा योग मात्र कदाचित आतापर्यंत आला नसेल. परंतु, आता हा हा योग आला आहे, असे समजा. सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात जमीनीपासून शेकडो फुटावर उडणारा गरुड पक्षी पाण्यात झेपावतो आणि पाण्यात पोहणाऱ्या माशाला क्षणार्थात पायात पकडून पुन्हा आकाशी झेपावत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ थक्क करणार आहे.

आयआरएस अधिकारी डॉ. भागीरथ मांडा (Dr Bhagirath Manda IRS) यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, हे सर्जिकल स्ट्राईक पहा. अचूकतेचे अत्यंत उत्तम उदाहरण. हा व्हिडिओ 5 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओला आतापर्यंत 16.7k व्ह्यूज मिळाले असून 651 लाईक्स आणि 107 रिट्विट्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले असून यावर भन्नाट प्रतिक्रीया देखील येत आहेत. (शार्क मासा चोचीत पकडून पक्षी समुद्रातून उडाला आकाशी, किनाऱ्यावरचे लोक बघतच राहिले, पाहा Viral Video)

पहा व्हिडिओ:

यात गरुडाच्या पंखांची एकंदर ग्रेस, समुद्रात झेपावण्याची धडाडी आणि पुन्हा आकाशात भरारी घेतानाची लय पाहण्याजोगी आहे. हा संपूर्ण व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहावा असाच आहे. निसर्गाने प्रत्येकाला काही विशेष दिले आहे. गरुडाचे हे वैशिष्ट नक्कीच वाखाण्याजोगे आहे. यावरुन बाजीराव मस्तानी सिनेमातील 'बाज की नजर..' हा डायलॉग नक्कीच आठवतो. बाज म्हणजे गरुड आणि त्याला लाभलेले सर्वोत्तम नजरेचे वरदान. यावरुनच असे बोलले जात असावे. किंवा कोणी मोठे यश संपादन केल्यावर त्याच्या भरारीला आपण गरुड झेप म्हणतो.